Agriculture news in marathi; Cotton prices in the state are less than guaranteed | Agrowon

राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

जळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी म्हणजेच ५५५० व ५४५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमीच आहेत. खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात पूर्वहंगामी कापसात आर्द्रता २५ ते ३० टक्के येत आहे. अधिक आर्द्रतेमुळे दर दबावात असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी म्हणजेच ५५५० व ५४५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमीच आहेत. खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात पूर्वहंगामी कापसात आर्द्रता २५ ते ३० टक्के येत आहे. अधिक आर्द्रतेमुळे दर दबावात असल्याची माहिती मिळाली. 

कोरडवाहू कापसात अजून वेचणी अपवाद वगळता फारशी सुरू झालेली नाही. पूर्वहंगामी (जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड) कापसात वातावरण कोरडे होताच वेचणीने वेग घेतला आहे. यातच थंड वातावरण तयार होत असल्याने बोंडे उमलण्याची प्रक्रिया काहीशी मंदावली आहे. काळ्या कसदार जमिनीत बोंडे उमलण्याची प्रक्रिया अधिकची मंद झाली आहे. शासकीय कापूस खरेदीबाबत सर्वत्र प्रतीक्षा आहे. 

खानदेश, पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील औरंगाबादपर्यंत कापसाची खेडा खरेदी सुरू झाली आहे. गुजरातमधील खरेदीदार या भागात येत आहेत. तर मराठवाडा, विदर्भातील यवतमाळ व लगतच्या भागातून आंध्र प्रदेशातील मोठे खरेदीदार एजंटच्या माध्यमातून कापूस खरेदी करीत आहेत. ही खरेदी अजून फारशी सुरू नाही. पण, खेडा खरेदीत दर्जेदार किंवा कमी आर्द्रतेचा कापसाला कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. तर अधिक आर्द्रता किंवा कमी दर्जाच्या कापसाला ४३०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. 
खानदेश, पश्‍चिम विदर्भासह खानदेशलगत गुजरात, मध्य प्रदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखाने या आठवड्यात सुरू झाले आहेत. या कारखान्यांतर्फेदेखील कापसाची खेडा खरेदी सुरू आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा, खरगोन, बऱ्हाणपूर, बडवानी आदी भागांतील बाजार व जिनिंग प्रेसिंग कारखान्यात मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल कमाल ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

राज्यात कापसाची आवक कमी असली तरी दरात फारशी वाढ झालेली नाही. सरकीच्या दरांवर आर्द्रता व कमी उचल यामुळे दबाव वाढल्याने दरवाढ थांबली आहे. परंतु, दर स्थिर आहेत. खानदेश, पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना भागांतील खासगी बाजार, जिनिंग व इतर राज्यांतील खरेदीदारांच्या एजंटकडे मिळून सुमारे १२ ते १३ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 


इतर अॅग्रोमनी
सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने खरीप मका,...
थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवरखत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिती...कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
पपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दरजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून,...
गुजरातमधून मागणी मंदावल्याने गूळ दरांत...कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला...
वाशीम : त्रुट्यांमुळे ‘किसान सन्मान’...वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा...
हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घटया सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या...
नागपुरी संत्रा चीनच्या 'प्रोटोकॉल'...नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...
संकेश्‍वरी मिरचीचा ‘ठसका’ यंदा गायबकोल्हापूर : गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने यंदा...
वायदा बाजारात सोयाबीन, कापसाच्या...या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट...
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...