agriculture news in marathi Cotton prices this year But a big drop in productivity | Page 2 ||| Agrowon

कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी घट; उत्पादकांच्या पदरी निराशा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही वातावरण आहे. विविध ठिकाणी कापसाला मिळालेल्या उच्चांकी दरांच्या पोस्ट समाज माध्यमात फिरत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असल्याचे कापूस उत्पादक सांगत आहे.

अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही वातावरण आहे. विविध ठिकाणी कापसाला मिळालेल्या उच्चांकी दरांच्या पोस्ट समाज माध्यमात फिरत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असल्याचे कापूस उत्पादक सांगत आहे. यंदा भाव आला पण उत्पादन घटले. त्यामुळे बरोबरीचाच व्यवहार झालेला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या वर्षी कापसाचे सरासरी ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होत आहे.

कापसाचा दर आठ हजार ते ८२०० पर्यंत सध्या मिळत आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक दर दिला जात आहे. कापसाला एवढा सरासरी दर यापूर्वी क्वचितच मिळाला असावा. यंदा मात्र सरसकटपणे हा दर सुरू असून, कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची चढाओढ बघायला मिळते आहे. असे असताना शेतकऱ्यांची परिस्थिती नेमकी उटल आहे. कापसाला दर मिळत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळतील असे वाटत होते. प्रत्यक्षात उत्पादन घटल्याने हा आनंद फार काळ टिकेल असे दिसत नाही.

खर्च तितकाच उत्पादनात मोठी घट
दरवर्षी शाश्‍वत कापूस उत्पादन काढणारे गणेश नानोटे (रा. निंभारा जि. अकोला) म्हणाले, ‘‘यंदा कापसाची एकरी उत्पादकता सहा ते सात क्विंटल आहे. आपल्याला किमान ३० टक्के कापूस उत्पादन कमी झाले आहे. दरवर्षी एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन निश्‍चित घेत असतो. या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडला आणि तापमान तब्बल ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले. त्याचा फटका बसला. सुरुवातीला जी बोंडे झाडांवर धरलेली होती ती परतीच्या पावसात खराब झाली. या दोन मुख्य कारणांनी उत्पादन घटले. उत्पादकता खर्च मात्र दरवर्षी करावा लागायचा तितकाच झालेला आहे. यंदा मिळत असलेला दर अधिक आहे. शासनाने आयात-निर्यात शुल्काचे धोरण बदलले तर दर कमी होण्याची चिंता आहे.

प्रमिलाताई भारसाकडे (रा. अकोट) म्हणाल्या, की यंदा एकरी दोन ते तीन क्विटंल उत्पादन होत आहे. आमची आठ एकरांत ओलिताची कपाशी पेरली होती. त्यातून आतापर्यंत २० क्विंटल कापूस आला. आणखी संपूर्ण शेतात आठ ते दहा क्विंटल कापूस येईल. म्हणजे एकरी चार ते पाच क्विटंल उत्पादन येईल. आठ एकराला ९० हजार रुपये खर्च झालेला आहे. यंदा कापसाचा भाव चांगला आहे. पण उत्पादन खर्चही वाढलेला आहे. चार ते पाच फवारणी, खते द्यावी लागली. वेचणीसाठी अधिक मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे भाव वाढल्याचा आनंद व्यक्त करायचा की उत्पादन खर्चही निघणार नसल्याने दुःख व्यक्त करावे, अशी परिस्थिती आहे. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...