agriculture news in Marathi cotton procured on less rate Maharashtra | Agrowon

कापसाची कवडीमोल दराने खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पावसाने आधीच कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जे हाती आले, तेही मातीमोल दराने विकावे लागत आहेत. 

नगर : पावसाने आधीच कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जे हाती आले, तेही मातीमोल दराने विकावे लागत आहेत. दर्जा नसल्याचे कारण पुढे करत गावपातळीवर कापूस खरेदी करणारे व्यापारी अल्प दराने कापसाची खरेदी करत आहेत. 

नगर जिल्ह्यात यंदा सव्वा लाख हेक्टरवर कापसाचे उत्पादन घेतले आहे. मात्र अजून कोठेच सरकारी खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. बाजार समितीच्या आवारात तसेच आठवडी बाजारात खासगी किरकोळ, ठोक खरेदीदार कापसाची खरेदी करत आहेत. मात्र कापसाला दर्जा नसल्याचे सांगत वाटेल त्या दरात कापूस खरेदी करून सर्रास लूट सुरू आहे. 

कापसाला साधारण ५८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित असताना पावसाने भिजलेल्या सोबत चांगल्या दर्जाचा कापूसही ३००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. मुळात कापूस वेचणीला प्रति किलोला दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत असताना तीस रुपये मिळतात, त्यामुळे पन्नास टक्केही रक्कम पदरात पडत नाही.

अनधिकृत खरेदी कोण थांबवणार 
नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या गावी, तसेच आठवडी बाजार असलेल्या गावांत खासगी खरेदीदार व्यापाऱ्यांनी सर्रास अनधिकृत दुकाने थाटली आहेत. बहुतांश खरेदीदार हे बाजार समित्यांशी निगडित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट केली जात असताना बाजार समित्या, स्थानिक ग्रामपंचायती अनधिकृत खरेदीकडे दुर्लक्ष करत आहेत.

प्रतिक्रिया
शेवगाव तालुक्यात गेल्या वर्षी दोन ठिकाणी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होती. यंदा अजूनही केंद्रे सुरू झाली नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवावी. 
- अप्पासाहेब हरदास, शेतकरी, वडुले बुद्रुक


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...