agriculture news in Marathi cotton procurement from 95 centers in state Maharashtra | Agrowon

राज्यात ९५ केंद्रावरुन कापसाची खरेदी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

सिसीआयने कापूस खरेदीची गती वाढविण्याची गरज आहे. त्याकरिता कापूस खरेदी बंद असलेल्या राज्यातील कर्मचारी महाराष्ट्रात आणले पाहिजे. त्यासोबतच खासगी जिनींग व्यवसायीकांना निकषानुसार कापूस खरेदीचे आवाहन केले पाहिजे. त्यांना अधिकृत एजंट म्हणून मान्यता दिली तरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कापूस घेणे शक्‍य होईल. अन्यथा शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. 
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर. 

नागपूरः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर कापूस खरेदीचा तिढा सुटला असला तरी प्रत्यक्ष खरेदी संदर्भातील अडचणी कायम आहेत. त्यामुळेच राज्यात कापूस खरेदीचा वेग वाढला नसल्याने ८० लाख क्‍विंटल कापसाची खरेदी कशी आणि केव्हा होईल, यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. राज्यात सिसीआयने ५२ तर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने ४३ केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरु केली आहे. 

एप्रिल महिन्याचे तुट विषयक निकष मे महिन्यातील खरेदी लावण्यात यावे, या मागणीवरुन जिनर्स आणि सिसीआयमध्ये खरेदीचा तिढा निर्माण झाला होता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर एप्रिल महिन्याचेच निकष मे महिन्याकरीता लावण्याचा निर्णय होत जिनर्संनी कापूस खरेदीची तयारी दर्शविली. त्यानंतर टप्याटप्याने सिसिआयकडून राज्यात ८३ पैकी ५२ केंद्रावर खरेदी होत आहे. कर्मचाऱ्यांची उपलब्धता, जिनींग व्यवसायीकाची तयारी यानुसार केंद्र वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात ५२ केंद्रावर रोज सरासरी ५० हजार क्‍विंटल कापसाची खरेदी होत असल्याचे सिसीआयच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पणन महासंघाचे ५४ केंद्र 
राज्यात कापूस पणन महासंघाकडून ७४ पैकी ५४ केंद्रावर खरेदी होत आहे. पणन महासंघाला २० एप्रिलपासून खरेदी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आजवर एक लाख १६ हजार क्‍विंटलची खरेदी झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी ५५ लाख ७४ हजार क्‍विंटलची खरेदी झाल्याचे कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी सांगीतले. 

पणन महासंघाचे जिल्हानिय्य केंद्र 

नागपूर पाच 
वर्धा तीन 
चंद्रपूर चार 
गडचिरोली एक 
यवतमाळ पाच
अकोला दोन 
वाशीम एक 
अमरावती सात
बुलडाणा दोन 
औरंगाबाद चार 
नगर तीन 
परभणी चार 
हिंगोली एक
बीड सहा
नांदेड दोन
जळगाव चार 

इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...