सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडा

पणनचे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले. मात्र, सलग तीन दिवस शासकीय सुट्या आल्यामुळे खरेदीला सुट्यांमुळे ‘ब्रेक’ लागला आहे.
सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडा
सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडा

यवतमाळ : बहूप्रतिक्षेनंतर २७ नोव्हेंबरला पणनचे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले. मात्र, शनिवार (ता.२८) ते सोमवार (ता.३०) सलग तीन दिवस शासकीय सुट्या आल्या. त्यामुळे पहिल्या दिवशी तीन हजार क्विटंल कापसाची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्यादिवसापासून खरेदीला सुट्यांमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. कापूस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. शेतकऱ्यांचे रब्बीचे नियोजन कापसावर अवलंबून असते. दसऱ्यापासून कापूस निघण्यास सुरुवात झाल्यानंतर कापूस विकून रब्बीची तयारी शेतकरी करतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून दसऱ्याला शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त चुकत आहे. यंदा तर दिवाळीनंतर पणनची कापूस खरेदी सुरु झाली. शुक्रवारी (ता.२७) पणनचे जिल्ह्यातील तीन केंद्र सुरु झाली. तीन केंद्रावर पाच जिनींग सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उशिरा का होईना शासकीय केंद्रांचा आधार मिळाला.  परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. परिणामी, खासगी बाजारात कापसाचे दर पाडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना कवडीमोल भाव देण्याची साखळी खासगी बाजारात तयार झाली आहे. शासकीय संकलन केंद्र सुरु झाल्यास याला आळा बसतो. त्यामुळेच शेतकरी शासकीय खरेदी केंद्र सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असतो. ‘सीसीआय’ने दिवाळीनंतर लगेच कापूस खरेदीला सुरुवात केली. त्यानंतर पणन महासंघाने दहा ते बारा दिवसानंतर केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. शुक्रवारी कापूस संकलन केंद्र सुरु केल्यानंतर पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील यवतमाळ, आर्णी व कळंब या तिन्ही केंद्रावर समाधानकारक प्रतिसाद दिसला. याठिकाणी तब्बल तीन हजार २६७ क्विटंल कापसाची खरेदी करण्यात आली. मात्र, त्यानंतर शनिवारपासून सुटी आल्याने सोमवारपर्यंत केंद्र बंद होते. परिणामी कापूस विक्रीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मंगळवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. १३५ वाहनांची नोंद पहिल्या दिवशी कापूस खरेदीला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. पाच जिनींग मध्ये १३५ वाहनांची नोंद करण्यात आली. यात यवतमाळ केंद्रावर ३८, कळंब येथे ४९ तर आर्णी केंद्रावर ४८ अशा १३५ वाहनांची नोंद करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com