agriculture news in Marathi cotton procurement of CCI starts in Khandesh Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस खेरदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव जिल्ह्यात आव्हाणे (ता. जि. जळगाव) येथील लक्ष्मी कॉटस्पीन व पाचोरा येथील जिनींग प्रेसिंग कारखान्यात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. 

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव जिल्ह्यात आव्हाणे (ता. जि. जळगाव) येथील लक्ष्मी कॉटस्पीन व पाचोरा येथील जिनींग प्रेसिंग कारखान्यात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. 

कापसाची १२ टक्‍क्‍यांपर्यंतची आर्द्रता, ३.५ ते ४.३ टक्के मायक्रोनीयर (ताकद) व २९.५ ते ३०.५ मिलिमीटर लांब धाग्याच्या दर्जेदार कापसाला ५५५० रुपये दर दिला जाणार आहे. कमी दर्जाच्या किंवा अधिक आर्द्रतेच्या कापसाची खरेदी टाळली जाईल. २७.५ ते २८.५ मिलिमीटर लांब धागा, ३.५ ते ४.७ मायक्रोनीयरच्या कापसाला ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जाईल. कापूस विक्रीसाठी आणताना कापूस पीक पेऱ्याची नोंद असलेला सातबारा उतारा, बॅंक पासबुकची झेरॉक्‍स, आधार कार्ड, आठ अ उतारा आणावा लागणार आहे.

जळगाव येथील केंद्रात जिल्ह्यातून कापसाची आवक झाली. खरेदीच्या शुभारंभाला जळगाव बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, जिनींग प्रेसिंग कारखानदार लक्ष्मण पाटील, प्रकाश नारखेडे, अविनाश भालेराव आदी उपस्थित होते. 

धुळे, नंदुरबारातही खरेदी सुरू होणार
सीसीआयतर्फे खानदेशात धुळे जिल्ह्यात शिरपूर व नंदुरबारमधील शहादा व नंदुरबारातही कापूस खरेदी सुरू होणार आहे. मध्यंतरी शिरपूर येथे केंद्र सुरू केले होते. परंतु, अधिक आर्द्रतेचा कापूस येत असल्याने कापसाची खरेदी या केंद्रात थांबविण्यात आली होती. 

पणनच्या खरेदीची प्रतीक्षा
पणन महासंघाची कापूस खरेदी जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यांत खरेदी करण्यासंबंधी स्थानिक अधिकारी, संचालक यांनी नियोजन केले. बुधवारी (ता. २०) खरेदी सुरू करण्यात येईल, असा दावा पणन महासंघाच्या सूत्रांनी केला होता. परंतु, खरेदीसंबंधीचे प्रस्ताव व इतर प्रक्रिया यास काही दिवस लागणार आहेत. यामुळे खानदेशात पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. महासंघ जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, पारोळा, धुळे, नाशिकमधील मालेगाव, येवला येथे खरेदी केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मिळाली.


इतर अॅग्रो विशेष
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...