मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरु
अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरालगतच्या यशवंत जिनिंग, सोमाणी जिनिंग, शहागड, दुनगाव येथे प्रत्येकी एक याप्रमाणे चार केंद्रे सुरु झाली आहेत.
अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरालगतच्या यशवंत जिनिंग, सोमाणी जिनिंग, शहागड, दुनगाव येथे प्रत्येकी एक याप्रमाणे चार केंद्रे सुरु झाली आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांना अखेर दिलासा मिळाला आहे.
अंबड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत अंबड बाजार समितीचे सभापती सतीश होंडे व सचिव पद्माकर सोंळुके यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आग्रह धरला. टोपे यांनी कोविड-१९ मध्ये सुद्धा केंद्राकडे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी सतत प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत आहे.
चार ही केंद्रांवर बैलगाडी, टेम्पो, ट्रॅक्टर यासह आदी वाहने घेऊन गर्दी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना ५७२५ रुपये ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी भाव मिळत आहे.
केंद्रावर प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचा सभापती सतीश होंडे, सचिव पद्माकर सोंळके, पी. आर. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. शहरालगतच्या यशवंत जिनिंगमध्ये मागील खरेदी साडे चारशे क्विंटल, शनिवारी (ता.२८) पाचशे क्विंटल, तर एकूण खरेदी ९५२ क्विंटल झाली.
शहागड येथे मागील खरेदी ११,९६९.९० क्विंटल, तर शनिवारी ९१०.१० क्विंटल, एकूण खरेदी १२,८८० क्विंटल झाली. दुनगाव येथील केंद्रावर मागील खरेदी ११,४००.३५ क्विंटल, शनिवारची खरेदी १३८२.८० क्विंटल, तर एकूण खरेदी १२,७८३.१५ क्विंटल झाली. एकूण ४५० शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला.