Agriculture news in marathi Cotton procurement centers will start in Khandesh from Monday | Agrowon

खानदेशात सोमवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

जळगाव : भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) नोडल संस्था म्हणून पणन महासंघ खानदेशात कापूस खरेदी येत्या सोमवारपासून (ता.२७) सुरू करणार आहे. ‘सीसीआय'चे केंद्र सुरू होण्याबाबत मात्र अनिश्‍चितता आहे. 

जळगाव : भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) नोडल संस्था म्हणून पणन महासंघ खानदेशात कापूस खरेदी येत्या सोमवारपासून (ता.२७) सुरू करणार आहे. ‘सीसीआय'चे केंद्र सुरू होण्याबाबत मात्र अनिश्‍चितता आहे. 

कापूस खरेदी सुरू करण्यासंबंधी जिल्हाधिकारी यांनी सीसीआय व पणन महासंघाला बजावले आहे. ‘सीसीआय'ने मात्र खरेदी सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली सुरू केलेल्या नाहीत. दुसरीकडे ‘सीसीआय'चे केंद्रधारक जिनींग कारखानदार एक क्विंटल कापसात ३५ किलो रुईचा उतारा व एक क्विंटल कापूस, सरकी, रुईमध्ये दोन टक्के घटीचा निकष बदलावा. या निकषानुसार कापूस खरेदी करणे नुकसानीचे आहे. कारण, कापूस कोरडा असून, उष्णतेमुळे रुई, सरकीचे वजन सतत कमी होईल. यात कारखानदारांचे नुकसान होईल, असे मुद्दे मांडत आहेत. 

जिल्हाधिकारी यांचीही केंद्रधारक कारखानदारांनी भेट घेतली असून, घट व उताऱ्याचे निकष बदलल्याशिवाय खरेदी सुरू न करण्यावर ते ठाम आहेत. यामुळे खानदेशातील ‘सीसीआय'चे कोणतेही केंद्र सुरू होणार नाहीत, अशी स्थिती तूर्ततरी आहे. 

जुने नियम का बदलले? 

पूर्वी विदर्भासाठी सीसीआय, महासंघाचे कापूस खरेदीसंबंधी जे निकष असायचे, त्यानुसार खानदेशातील नियमात बदल केले जायचे. कारण, खानदेश उष्ण भाग आहे. विदर्भात ३५ टक्के उताऱ्याचा निकष असला, तर खानदेशात हा निकष ३४ टक्के असायचा. विदर्भासाठी घटीचा निकष दोन टक्के असला, तर खानदेशसाठी हा निकष तीन ते साडेतीन टक्के असायचा. परंतु, अलीकडील दोन-तीन वर्षांत नियम सर्व भागांसाठी एकसारखे केले आहेत. ते खानदेशातील केंद्रधारक कारखानदारांच्या दृष्टीने वित्तीय नुकसान करणारे आहेत. कारखानदार नुकसान सहन करून जिनींग कारखाने कसे सुरू करतील? कापूस खरेदी कशी करायची? असा प्रश्‍न ‘सीसीआय'चे केंद्रधारक कारखानदार अविनाश भालेराव यांनी उपस्थित केला.  
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...