दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
पणन महासंघाची खरेदी उद्यापासून
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून शुक्रवारपासून (ता. २७) कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून शुक्रवारपासून (ता. २७) कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव, परळी वैजनाथ, परभणी हे तीन झोन वगळता उर्वरित आठ झोनमध्ये ही खरेदी होईल, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.
तेलंगणाच्या धर्तीवर कापूस खरेदीमधील अनियमितता रोखण्यासाठी नोंदणीसाठी विशेष मोबाईल ‘ॲप’ विकसित करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला होता. एका बँकेने याकरिता वित्तपुरवठा करण्याची तयारी चालविली होती. मात्र पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना यांची ऐनवेळी बदली झाली. त्यांच्या जागेवर नियुक्त ए. बी उन्हाळे यांनी कौटुंबिक कारणामुळे पदभार स्वीकारला नाही.
परिणामी ‘ॲप’च्या माध्यमातून नोंदणीचा प्रस्ताव रखडला. नोंदणीचीच प्रक्रिया रखडल्याने खरेदीबाबत देखील निर्णय होत नव्हता. मात्र कापूस उत्पादकांच्या घरात कापूस साठवणुकीची जोखीम वाढल्याने त्यांच्याकडून खरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्याच्या परिणामी अखेरीस अकरापैकी आठ झोनमध्ये कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीदेखील त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे, असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची मागणी होत असल्याने याबाबत तत्काळ निर्णय व्हावा, याबाबत पणन सचिव अनुप कुमार यांच्यासोबत बुधवारी (ता. २५) मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार निविदा प्रक्रिया झालेल्या व जिनिंग व्यावसायिकांची तयारी असलेल्या केंद्रांवर शुक्रवार (ता.२७) पासून खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता असल्याने कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही. शेतकऱ्यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ केला जाईल.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ
- 1 of 654
- ››