agriculture news in Marathi cotton procurement of cooperative federation will be start Maharashtra | Agrowon

पणन महासंघाची खरेदी उद्यापासून

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून शुक्रवारपासून (ता. २७) कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून शुक्रवारपासून (ता. २७) कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव, परळी वैजनाथ, परभणी हे तीन झोन वगळता उर्वरित आठ झोनमध्ये ही खरेदी होईल, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

 तेलंगणाच्या धर्तीवर कापूस खरेदीमधील अनियमितता रोखण्यासाठी नोंदणीसाठी विशेष मोबाईल ‘ॲप’ विकसित करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला होता. एका बँकेने याकरिता वित्तपुरवठा करण्याची तयारी चालविली होती. मात्र पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना यांची ऐनवेळी बदली झाली. त्यांच्या जागेवर नियुक्त ए. बी  उन्हाळे यांनी कौटुंबिक कारणामुळे पदभार स्वीकारला नाही.

परिणामी ‘ॲप’च्या माध्यमातून नोंदणीचा प्रस्ताव रखडला. नोंदणीचीच प्रक्रिया रखडल्याने खरेदीबाबत देखील निर्णय होत नव्हता. मात्र कापूस उत्पादकांच्या घरात कापूस साठवणुकीची जोखीम वाढल्याने त्यांच्याकडून खरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्याच्या परिणामी अखेरीस अकरापैकी आठ झोनमध्ये कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीदेखील त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे, असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची मागणी होत असल्याने याबाबत तत्काळ निर्णय व्हावा, याबाबत पणन सचिव अनुप कुमार यांच्यासोबत बुधवारी (ता. २५) मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार निविदा प्रक्रिया झालेल्या व जिनिंग व्यावसायिकांची तयारी असलेल्या केंद्रांवर शुक्रवार (ता.२७) पासून खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता असल्याने कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही. शेतकऱ्यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ केला जाईल. 
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ


इतर बातम्या
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा...नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...