Agriculture news in Marathi Cotton procurement is likely to continue till Diwali in Warud taluka | Agrowon

वरुड तालुक्‍यात दिवाळीपर्यंत कापूस खरेदी चालण्याची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

अमरावती ः वरुड येथील सीसीआयने सुरू केलेल्या एका कापूस केंद्रावर सुमारे ४ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आजवर केवळ २१४ शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी झाल्याने पुढच्या हंगामातील कापूस बाजारात येईपर्यंत कापूस खरेदी करणार काय? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

अमरावती ः वरुड येथील सीसीआयने सुरू केलेल्या एका कापूस केंद्रावर सुमारे ४ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आजवर केवळ २१४ शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी झाल्याने पुढच्या हंगामातील कापूस बाजारात येईपर्यंत कापूस खरेदी करणार काय? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपायाअंतर्गंत जाहीर संचारबंदीत कापूसही लॉकडाऊन झाला. परिणामी कापसाची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी वाढली. दबावामुळे २० एप्रिलनंतर शासनाने टप्याटप्याने खरेदी सुरू केली. वरुड परिसरात सीसीआयने एका केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी चालविली आहे. त्यातही नियम, अटींवर भर दिला जात असल्याने ही खरेदी दिवाळीपर्यंतही होण्याची शक्‍यता नाही. 

वरुड येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी ४४८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील आजवर फक्‍त २१४ शेतकऱ्यांकडील कापसाचे मोजमाप होऊ शकले. त्यावरून कापूस खरेदीच्या गतीचा अंदाज येत असल्याने या खरिपातील कापूस बाजारात येईपर्यंत गेल्या हंगामातील कापसाची खरेदी होत राहील, अशी भीती शेतकरी व्यक्‍त करीत आहेत. खरिपाकरिता शेतकऱ्यांना पैशाची गरज राहते. शेतमाल विक्रीतून ती भागविली जाते. त्यामुळे कापूस खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी होत आहे. 

खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा याकरिता शेतकरी कापूस विकत आहेत. परंतु एकच केंद्र असल्याने आणि खरेदीची गती पाहता येत्या दिवाळीपर्यंतही खरेदी शक्‍य नाही. त्यामुळे तालुक्‍यातील इतर जिनींगमध्ये खरेदी व्हावी, अशी मागणी आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे मागणी केली आहे. 
- विक्रम ठाकरे, सभापती, पंचायत समिती, वरुड 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...