agriculture news in Marathi cotton procurement of marketing federation will start from today Maharashtra | Agrowon

आजपासून कुठे-कुठे होणार पणनची कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

अमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी बुधवार (ता. २७) आजपूासन होणार आहे. अमरावती येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरीमध्ये काटापूजन करीत खरेदीला प्रारंभ होईल. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येतील, असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी सांगितले. 

अमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी बुधवार (ता. २७) आजपूासन होणार आहे. अमरावती येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरीमध्ये काटापूजन करीत खरेदीला प्रारंभ होईल. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येतील, असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी सांगितले. 

राज्यात सीसीआयची खरेदी सुरूच आहे. परंतु पावसाअभावी कापसाची प्रत योग्य नसल्याने कापूस खरेदीबाबत सीसीआयने सावध पावित्रा घेतला आहे. कापूस खरेदीबाबत वाच्यतादेखील केली जात नसल्याने शासकीय खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेरीस साऱ्या शक्‍यता आणि चर्चांना पूर्णविराम देत सीसीआयचा एजंट म्हणून पणन महासंघाने बुधवार (ता.२७) पासून खरेदीचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने काटापूजन होणार असून हा कार्यक्रम वलगाव पोलिस ठाण्यामागे असलेल्या शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरीमध्ये दुपारी चार वाजता होईल. 

या वेळी पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर, खासदर नवनित राणा, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासह पणन महासंघाचे संचालक उषा शिंदे, राजकिशोर मोदी, शिरीष धोत्रे, सुरेश चिंचोळकर, ॲड. सुधीर कोठारी, शिवाजी दसपूते, भरत चामले, नामदेव केशवे, प्रसेनजीत पाटील, पंडित चोखट, सुरेश देशमुख, नरेंद्र ठाकरे, संजय पवार, ययाती नाईक उपस्थित राहतील. 

आर्दतेवर ठरणार दर 
कापसात आठ टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तरच हमीभाव दिला जाणार आहे. त्यानंतर प्रती टक्क्‍यानुसार प्रती किलोची किंमत कमी होईल. बारा टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तर चार किलोचे हमीभावानुसार पैसे कमी केले जाणार असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगीतले. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून आर्दतेचा विचार करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. 

असे आहेत केंद्र 
अकोला ः
बोरगावमंजू, मानोरा, कारंजा 
अमरावती ः अमरावती, लेहगाव, अंजनगाव, अचलपूर, वरुड 
नागपूर ः (सावनेर, काटोल, पारशिवणी, उमरेड, फुलगाव) 
नांदेड ः भोकर, तामसा. 
परभणी ः गंगाखेड, हिंगोली, परभणी 
वणी ः चिमूर, गोंडपिंपरी 
यवतमाळ ः यवतमाळ, आर्णी, पुसद, कळंब, उमरखेड 
खामगाव ः जळगाव जामोद, देऊळगावराजा 
औरंगाबाद ः बालानगर, तुर्काबाद, सिल्लोड, खामगाव फाटा, चापडगाव. 
परळी ः माजलगाव, भोपा, धर्मापूरी, गोडगाव हुडा, केज 
जळगाव ः धरणगाव, अमळनेर, दळवेल, भडगाव, येवला. 
 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...
फळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...
मोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...
खाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...
‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...
गोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....
फेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...
`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...
सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस...डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर...
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...