agriculture news in Marathi cotton procurement season will be late Maharashtra | Agrowon

कापूस हंगाम लांबणीवर?

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी सुरु होईल.

नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी सुरु होईल. तरीसुद्धा बाजारात कापूस आल्यास तो खरेदीची आमची तयारी असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल यांनी दिली. 

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने एफएक्यू दर्जाचा कापूस बाजारात दाखल झाल्यास त्याच्या खरेदीची तयारी दर्शवली आहे. त्याकरिता राज्य सरकारने नोंदणी व इतर प्रक्रिया पार पाडावी असा त्यांचा आग्रह आहे. राज्यात यावर्षी सीसीआयने पहिल्या टप्प्यात ६२ केंद्राकरिता निविदा काढली आहे.

त्यानंतर कापसाची आवक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे. ज्या ६२ केंद्रांसाठी निविदा काढली आहे, त्याठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुद्धा काही बाजार समित्यांनी सुरू केली आहे. कापूस उत्पादकांची नोंदणी,  केंद्राच्या परिसरात कायदा- सुव्यवस्था व इतर सर्व प्रक्रिया या राज्य सरकार म्हणजे स्थानिक प्रशासनाला पार पाडाव्या लागतात. 

सीसीआयकडून केवळ कापूस खरेदी होते. त्यामुळे खरेदीपूर्वीची नोंदणी प्रक्रिया राज्य सरकारला पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर खरेदी सुरू होईल, असेच सांगण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर अखेर कापूस खरेदी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बाजारात कमी दर
केंद्र सरकारने या वर्षी कापसाला ५८५० रुपये हमी भाव जाहीर केला आहे. याउलट खुल्या बाजारात मात्र कापसाची अवघ्या ४१०० रुपये दराने खरेदी होत आहे. कापसात ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने अशा कापसाला कमी दर मिळत असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. अमरावतीत एका व्यापाऱ्याकडून हमीभावापेक्षा पंधराशे रुपये कमी दराने कापसाची खरेदी झाली. कापसाची आवक बाजारात होत असल्याने शासकीय कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

प्रतिक्रिया
बाजारात कापूस आल्यास आमची खरेदीची तयारी आहे. त्याकरिता नोंदणीची प्रक्रिया राज्य सरकारला पार पाडावी लागते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी होईल. 
— प्रदीपकुमार अग्रवाल, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय).
---
नोंदणी करता विशेष ‘अॕप’ देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. हंगाम लांबल्याने ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी होईल. त्यापूर्वी नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...