शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
ताज्या घडामोडी
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु
नांदेड : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय) वतीने कलदगाव, दाभड (ता. अर्धापूर) येथे गुरुवारी (ता.१९) तसेच नायगाव येथे बाजार समितीच्या यार्डात शुक्रवारी (ता.२०) कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.
नांदेड : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय) वतीने कलदगाव, दाभड (ता. अर्धापूर) येथे गुरुवारी (ता.१९) तसेच नायगाव येथे बाजार समितीच्या यार्डात शुक्रवारी (ता.२०) कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी व्हावा, यासाठी कलदगाव आणि दाभड (ता. अर्धापूर) येथे ‘सीसीआय’साठी कापूस खरेदी केंद्राची सुरवात गुरुवारी (ता. १९) झाली. आजपर्यंत कलदगाव येथील सालासर जिनिंग फॅक्टरीवर ९०० क्विंटल कापसाची खरेदी झाली, अशी माहिती बाजार समितीकडून मिळाली.
नायगाव येथे ‘सीसीआय’तर्फे शुक्रवारी (ता.२०) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केद्रांचे उद्घाटन माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या हस्ते झाले. भारतीय कपास निगमचे केंद्र प्रमुख गणेश सोनवणे, सहायक निबंधक सुनील गल्लेवार, उपसभापती मोहन पाटील धुप्पेकर, संचालक माधवराव बेळगे, शिवराज पाटील होटाळकर, भगवान लंगडापुरे, सगमंनाथ कवटीकवार, सतीश लोकमनवार, केशवराव दासवाड, पत्तेवार उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा सत्कार
कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना सहकार्य करा. त्यांची हेंडसाळ होणार नाही, याची दक्षता घ्या. शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना सभापती वसंत चव्हाण यांनी दिल्या.
- 1 of 1021
- ››