agriculture news in marathi Cotton procurement started at Kaladgaon, Naigaon | Agrowon

कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय) वतीने कलदगाव, दाभड (ता. अर्धापूर) येथे गुरुवारी (ता.१९) तसेच नायगाव येथे बाजार समितीच्या यार्डात शुक्रवारी (ता.२०) कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय) वतीने कलदगाव, दाभड (ता. अर्धापूर) येथे गुरुवारी (ता.१९) तसेच नायगाव येथे बाजार समितीच्या यार्डात शुक्रवारी (ता.२०) कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी व्हावा, यासाठी कलदगाव आणि दाभड (ता. अर्धापूर) येथे ‘सीसीआय’साठी कापूस खरेदी केंद्राची सुरवात गुरुवारी (ता. १९) झाली. आजपर्यंत कलदगाव येथील सालासर जिनिंग फॅक्टरीवर ९०० क्विंटल कापसाची खरेदी झाली, अशी माहिती बाजार समितीकडून मिळाली. 

नायगाव येथे ‘सीसीआय’तर्फे शुक्रवारी (ता.२०) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केद्रांचे उद्‍घाटन माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या हस्ते झाले. भारतीय कपास निगमचे केंद्र प्रमुख गणेश सोनवणे, सहायक निबंधक सुनील गल्लेवार, उपसभापती मोहन पाटील धुप्पेकर, संचालक माधवराव बेळगे, शिवराज पाटील होटाळकर, भगवान लंगडापुरे, सगमंनाथ कवटीकवार, सतीश लोकमनवार, केशवराव दासवाड, पत्तेवार उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचा सत्कार

कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना सहकार्य करा. त्यांची हेंडसाळ होणार नाही, याची दक्षता घ्या. शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना सभापती वसंत चव्हाण यांनी दिल्या.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...