agriculture news in Marathi cotton procurement started in khandesh Maharashtra | Agrowon

शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच खुल्या बाजारातील कापूस दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी वधारले आहेत. 

जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच खुल्या बाजारातील कापूस दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी वधारले आहेत. खुल्या बाजारात किंवा खेडा खरेदीत कापसाचे दर ५२११ ते ५२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.  खानदेशात कापूस महामंडळाने (सीसीआय) गेल्या आठवड्यात खरेदी सुरू केली. 

खरेदी वेगात सुरू असून, मोठ्या तालुक्यांत किंवा अधिक आवक असलेल्या केंद्रातील भार वाढू नये यासाठी इतर दोन केंद्रांचीदेखील नियुक्ती केली आहे. आवक वाढल्याने प्रक्रिया थांबणे व खरेदी बंद करणे, असा प्रकार यंदा होणार नाही, याची काळजी घेतली आहे. ‘सीसीआय’चे केंद्र वेगात सुरू असतानाच खेडा खरेदीत कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. 

खानदेशात दरवर्षी मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानदार खरेदी करतात. परंतु गेल्या वर्षी कारखानदार अडचणीत आल्याने खरेदी झाली नाही. यंदाही खासगी कारखानदार खरेदी करीत नसल्याची स्थिती आहे. यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या सुरवातीला कापसाचे दर ४५००, ४७०० व ४९०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

शासकीय खरेदी सुरू होत नसल्याने खासगी खरेदीदार लुटालूट करीत असल्याचा आरोप केला जात होता. परंतु गेल्या आठवड्यात शासकीय खरेदी सुरू होताच खुल्या बाजारातील कापसाचे दर ५२११ ते ५२५० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. 

खेडा खरेदीला प्रतिसाद नाहीच
किरकोळ खरेदीदार खेडा खरेदी करीत आहेत. परंतु शासकीय केंद्रात किमान ५६०० व कमाल ५७२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकरी नजीकच्या शासकीय केंद्रात कापसाची विक्री करीत आहेत. खेडा खरेदीला शेतकरीच प्रतिसाद देत नसल्याची स्थिती गेल्या आठवड्यात तयार झाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...