agriculture news in marathi, cotton procurement starts after diwali, jalgaon, maharashtra | Page 3 ||| Agrowon

‘सीसीआय’कडून दिवाळीनंतर कापूस खरेदी

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

‘सीसीआय’ने कापूस खरेदीसाठी केंद्रे निश्‍चित केली आहेत. खरेदीसंबंधी अजून आदेश आलेले नाहीत. ८५० रुपये प्रतिगाठ, असे दर केंद्रचालक किंवा संबंधित जिनिंग प्रेसिंग कारखानदारास मिळणार आहेत. खरेदी करताना कारखानदार व ग्रेडर संयुक्तपणे कार्यवाही करू शकतील. कारण मापदंड, निर्देशानुसार कापूस खरेदी झाली नाही तर नुकसान जिनिंग प्रेसिंग कारखानदारास सोसावे लागेल. 
- अविनाश भालेराव, सीसीआय कापूस खरेदी केंद्रधारक, जळगाव

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) राज्यात दिवाळीनंतर कापूस खरेदीला सुरवात करणार आहे. कापूस खरेदीसंबंधी राज्यात केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. अकोला व औरंगाबाद विभागात मिळून सुमारे १८२ केंद्रे टप्प्याटप्प्यानी सुरू होतील, अशी माहिती आहे. 

सध्या खानदेश, विदर्भ व इतर भागांत ४० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्द्रतेचा कापूस येत आहे. कोरडवाहू कापूस वेचणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वेगात सुरू होऊ शकते. अतिपावसाने अनेक भागांत कापूस हंगाम लांबणीवर पडला आहे. ‘सीसीआय’ ९ टक्के आर्द्रता व ३४ टक्के उतारा (एक क्विंटल कापसात ३४ किलो रुईचे उत्पादन) ज्या कापसात मिळेल, त्यास ५५५० रुपये क्विंटल दर देणार आहे. हे दर सुरवातीला दिले जातील. जसे महिने बदलतील, तसे दरही बदलतील. किमान ५४५० रुपये क्विंटल दर ‘सीसीआय’ देणार आहे. देशभरात १० लाख कापूस गाठींची खरेदी केली जाईल, असे संकेत नुकतेच ‘सीसीआय’च्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

‘सीसीआय’ अकोला विभागांतर्गत विदर्भातील सर्व जिल्हे व औरंगाबाद विभागांतर्गत खानदेश व मराठवाडा भागात खरेदी केंद्रे सुरू करेल. खरेदीसंबंधी केंद्रे निश्‍चित केली आहेत. ‘सीसीआय’ शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून गाठींची निर्मिती करणार आहे. यासाठी खरेदी जिनिंग प्रेसिंग कारखान्यात होईल. त्यासाठी ‘सीसीआय’ने जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये हे केंद्र निश्‍चित केले आहे. खानदेशात ११ केंद्रे असतील. गाठींची निर्मिती करण्यासाठी जिनिंग कारखानदार किंवा मालकाला प्रतिगाठ ८५० रुपये दर निश्‍चित केला आहे. 

यात कापूस खरेदीनंतर जिनिंगमधील कापसाची हाताळणी, रुईची निर्मिती, प्रेसिंग, गाठ बांधण्यासह जिनिंगमध्ये सुरक्षित भागात गाठीचा साठा करण्याचा खर्च जिनिंग मालकास करावा लागेल. गाठ बांधण्यासाठी आवश्‍यक कापड ‘सीसीआय’ आपले केंद्र निश्‍चित केलेल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात देणार आहे. प्रतिनग १०० रुपये खर्च या कापडासाठी येणार असून, हा खर्च ‘सीसीआय’ करील. 

यंदा कापूस उत्पादन वाढ, दरांवरील दबाव व इतर मुद्दे चर्चेत असल्याने ‘सीसीआय’चे खरेदी केंद्र आपल्या जिनिंगमध्ये सुरू व्हावे यासाठी या केंद्र निश्‍चितीच्या  ई-निविदा प्रक्रियेत अनेक जिनिंग प्रेसिंग कारखानदारांनी सहभाग घेतला. खानदेशातील ११ केंद्रांसंबंधी सुमारे ४० निविदा आल्या होत्या. 

खानदेशात धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमध्ये शहादा व नंदुरबार तर जळगाव जिल्ह्यात जळगाव, पाचोरा, एरंडोल, बोदवड, जामनेर, पहूर (ता. जामनेर), शेंदूर्णी (ता. जामनेर), कऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) येथे खरेदी केंद्र सुरू होतील. खरेदी सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबींचे आदेश अद्याप ‘सीसीआय’ने कुठल्याही केंद्राला दिलेले नाहीत. परंतु संबंधित केंद्रात ग्रेडरची नियुक्ती केली आहे. 
 
गाठींसाठी मापदंड निश्‍चित
कापसावर प्रक्रिया होऊन ज्या गाठी तयार केल्या जातील, त्यासाठीचे मापदंड ‘सीसीआय’ने निश्‍चित केले आहेत. त्यात गाठीमध्ये २.५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कचरा वगैरे (ट्रॅश) नको, तर फक्त ८ टक्के आर्द्रता असायला हवी. हे मापदंड जेथे पाळले जाणार नाहीत, तेथे होणाऱ्या नुकसानीला जिनिंग प्रेसिंग कारखानदार जबाबदार असतील, असे सूत्रांनी सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...