Agriculture news in marathi Cotton procurement starts in Jalgaon Jamod | Agrowon

जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव खरेदीसाठी जळगाव जामोद येथील श्री कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये प्रारंभ करण्‍यात आला. वडशिंगी येथील सहदेवराव खिरोडकार यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.

बुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव खरेदीसाठी जळगाव जामोद येथील श्री कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये प्रारंभ करण्‍यात आला. यावेळी वडशिंगी येथील सहदेवराव खिरोडकार यांच्या हस्ते काटापूजन करून प्रथम कापूस आणणारे शेतकरी जानराव शामराव आटोळे व रघुनाथ राजाराम कोकाटे यांचा शेला टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील, बाजार समिती संचालक राजेंद्र देशमुख, प्रकाश
गावंडे, शहादेव सपकाळ, रामेश्वर मानकर व कापूस महासंघाचे झोनल मॅनेजर एस. व्ही. खडसे, केंद्र प्रमुख पी. व्ही. गावंडे, जिनिंग फॅक्टरी संचालक प्रमोद कुटे, बाजार समितीचे सर्व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

मानोरामध्ये खरेदी केंद्राची मागणी
वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात कापसाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला असून, तेथे पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळाने तहसीलदारांमार्फत संबंधितांकडे केली आहे. 
बाजार समितीने म्हटले आहे, कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. २० जुलै रोजी पणन महासंघाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याबाबतचे पत्रान्वये कळविले होते. त्यानुसार बाजार समितीमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हे शेतकरी खरेदी कधी सुरू होते याकडे लक्ष देऊन आहेत.

मानोरा हा कापूस उत्पादक पट्टा असून, येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले तर मोठ्या प्रामाणात कापूस खरेदी होईल, अशी अपेक्षा निवेदनात सभापती गोविंद चव्हाण, उपसभापती राजेश नेमाने, संचालक सुनील राठोड, द्वारकादास राठोड यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री शंभुराजे देसाई, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या 
आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...