Agriculture news in marathi Cotton procurement starts at nine centers in Parbhani, Hingoli | Agrowon

परभणी, हिंगोलीतील नऊ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

परभणी : जिल्ह्यातील ९ पैकी ८ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ खरेदी केंद्रावर अशा एकूण ९ केंद्रांवर कापूस खरेदीस सुरुवात झाली, अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली. 

परभणी : जिल्ह्यातील ९ पैकी ८ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ खरेदी केंद्रावर अशा एकूण ९ केंद्रांवर कापूस खरेदीस सुरुवात झाली, अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली. 

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, करम (ता.सोनपेठ), गंगाखेड येथील केंद्रावर सोमवारी (ता.४) कापूस खरेदीस सुरुवात झाली. परभणी येथे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके, बाजार समितीचे संजय तळणीकर, जिनिंग उद्योजक प्रेम डागा आदी उपस्थितीत होते. 

पाथरी येथे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस खरेदी सुरु झाली. परभणी जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर पहिल्या दिवशी एकूण २ हजार ५६० क्विंटल कापसाची खरेदी झाली. परभणी येथील केंद्रावर दररोज ५० शेतकऱ्यांचा, तर अन्य केंद्रावर हमाल कामगारांच्या कमतरतेमुळे दररोज २५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल, असे रेनके यांनी सांगितले. 

यापूर्वी ‘सीसीआय’च्या मानवत, जिंतूर, पूर्णा येथील केंद्रावर खरेदी सुरु झाली. मंगळवारी (ता.६) सेलू येथील केंद्र कार्यान्वित करण्यात आले. मंगळवार (ता.६) पर्यंत जिल्ह्यातील सीसीआय आणि महासंघाच्या मिळून एकूण नऊ पैकी प्रत्येकी चार अशा आठ केंद्रांवर कापूस खरेदी सुरु झाली. 

हिंगोलीतही खरेदी सुरु 

जवळा बाजार (ता.औंढानागनाथ) कृषी उत्पन्न बाजार समितींतंर्गत मार्डी येथील जिनिंग कारखान्यात सोमवारी (ता.४) ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीस सुरुवात झाली. बाजार समितीचे सभापती अंकुश आहेर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मैत्रेवार, बाजार समितीचे सचिव रमेश चोखट आदी उपस्थित होते. हयातनगर येथील केंद्रावर लवकरच कापूस खरेदी सुरु होईल, असे सूत्रांनी सांगितले. 
 

 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...