agriculture news in Marathi cotton procurement will start form Monday Maharashtra | Agrowon

राज्यात सोमवारपासून कापूस खरेदी : पणन मंत्री बाळासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

सोमवारपासून (ता. 20) कापूस खरेदी सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्सीग पाळून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना केल्या.

कऱ्हाड, जि. सातारा ः कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खाण्देशामधील शेतकऱ्यांची कापूस खरेदी थांबली होती. येत्या सोमवारपासून (ता. 20) कापूस खरेदी सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्सीग पाळून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना केल्याची माहीती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात कापूस महत्वाचे पीक असून विदर्भ, मराठवाडा, खाण्देश व पश्‍चिम महाराष्‍ट्रातील दुष्‍काळी भागात प्रामुख्याने ते पीक घेतले जाते. तेथील सर्वसामान्य शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण त्यावर अवलंबून असते. यंदा कापसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन झाले आहे. कापूस फेडरेशन व सीसीआयच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली. मात्र कोरोनाचे संकटामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना तेथे येणे शक्य नसल्याने कापूस खेरदी थांबली.

दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी वाढत असताना शेतीपूरक व्यवसायांना मुभा देण्याची केंद्र व राज्याची सुरवातीपासूनच भूमिका राहीली आहे. औषधे दुकानांसह ते उत्पादन करणाऱ्या कारखान्यानाही यात मुभा दिली आहे. 

ते म्हणाले, कापूस खरेदीसाठी मुंबई येथे आज पणनची बैठक झाली. त्यात 20 एप्रिलपासून राज्यात कापूस खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. विदर्भ, मराठवाडी, खान्देशमधील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचनाही दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सींगचा वापर करून त्या- त्या जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करावी. शेतकऱ्यांनीही चांगल्या प्रतिचा कापूस केंद्रावर आणावा, त्यासाठीचे नियोजन करावे. त्यासाठी कापूस खरेदी केंद्र, स्थानिक बाजार समित्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. जे शेतकरी ऑनलाईन बुकींग किंवा दूरध्वनीवरून कळवणार आहेत, त्यांना कोणत्या वेळी केंद्रावर कापूस आणावा याबाबच्या सूचना देण्याबाबत सांगितले आहे.  

केंद्रावर येणाऱ्या कापसाची प्रत तपासून तो खरेदी केला जाईल. त्यानंतर पुढची प्रक्रीया केली जाईल. लॉकडाऊनमुळे  उन्हाळ्याच्या दिवसातही शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला आहे, तो खरेदी झाला पाहीजे, ही शासनाची भूमिका आहे. 61 तालुक्यात 74 कापूस खरेदी केंद्रे आहेत. सोमवारी पहिल्या टप्प्यात यातील काही केंद्रावर खरेदीस सुरवात होईल. त्यापाठोपाठ अन्य केंद्रावरही खरेदी प्रक्रीया सुरू होईल. 

जिनींग मिलमधील कामगारांच्या उपलब्धतेबाबतच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, बहुतेक कामगार हे छतीसगड राज्यातील आहेत. मात्र काही स्थानिक कामगारही आहेत. अनेक कामगार छतीसगडला गेले असले तरी न गेलेल्यासह स्थानिक कामगारांच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांना बोलवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मिल सुरू झाल्यानंतर स्थानिक कामगारही येतील.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...