Agriculture news in marathi; Cotton producer Prakash Puppalwar is honored | Agrowon

कापूस उत्पादक प्रकाश पुप्पलवार यांचा गौरव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

यवतमाळ  ः इंडियन कॉटन असोसिएशन तसेच वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पांढकरवडा तालुक्‍यातील खैरगाव देशमुख येथील कापूस उत्पादक व प्रयोगशील शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांचा गौरव करण्यात आला. कापूस उत्पादकता वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची उपस्थिती होती. 

यवतमाळ  ः इंडियन कॉटन असोसिएशन तसेच वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पांढकरवडा तालुक्‍यातील खैरगाव देशमुख येथील कापूस उत्पादक व प्रयोगशील शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांचा गौरव करण्यात आला. कापूस उत्पादकता वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची उपस्थिती होती. 

खैरगाव देशमुख येथील प्रकाश पुप्पलवार हे दरवर्षी सुमारे १५ ते वीस एकरावर कापसाची लागवड करतात. बीटी कापूस लागवडीत त्यांचे सातत्य असून उत्पादकता वाढीसाठी देखील ते प्रयत्नशील असतात. कापूस शेतीच्या सिंचनाकरिता ठिबकचा अवलंब, त्याव्दारे विद्राव्य खताचा पिकाला पुरवठा तसेच व्यवस्थापनाच्या इतर तांत्रिक बाबींवर त्यांचा भर राहतो. या माध्यमातून एकरी सरासरी १५ क्‍विंटलची उत्पादकता त्यांना मिळते. कापूस व्यवस्थापन व त्याद्वारे उत्पादकता वाढ, अशा या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी  केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला इंडियन कॉटन असोसिएशनचे महेश सारडा, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सीसीआयचे रामी यांची यावेळी उपस्थिती होती. 


इतर बातम्या
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...