agriculture news in Marathi cotton producers got demurrage Maharashtra | Agrowon

वाहतूक भाड्याचा भुर्दंड; केंद्रचालकांचा गलथानपणा सुरूच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

जळगाव : खानदेशात कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाची कापूस खरेदी काही केंद्रांमध्ये सुरू आहे. या केंद्रांमध्ये कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन दिले जात नसल्याने त्यांना जादा वाहतूक भाड्याचा भुर्दंड व रांगेत थांबण्याचा केंद्रातील मुक्कामाचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक फटका बसत आहे. 

यासंदर्भात नंदुरबार येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णदास पाटील, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे शशिकांत भदाणे, गुलाबसिंग गिरासे, कडूअप्पा पाटील, ईश्‍वर लिधुरे आदींनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की कापूस खरेदी खानदेशात पुन्हा सुरू झाली आहे.

जळगाव : खानदेशात कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाची कापूस खरेदी काही केंद्रांमध्ये सुरू आहे. या केंद्रांमध्ये कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन दिले जात नसल्याने त्यांना जादा वाहतूक भाड्याचा भुर्दंड व रांगेत थांबण्याचा केंद्रातील मुक्कामाचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक फटका बसत आहे. 

यासंदर्भात नंदुरबार येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णदास पाटील, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे शशिकांत भदाणे, गुलाबसिंग गिरासे, कडूअप्पा पाटील, ईश्‍वर लिधुरे आदींनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की कापूस खरेदी खानदेशात पुन्हा सुरू झाली आहे.

सीसीआयची खरेदी नंदुरबार, धुळे व जळगावात सुरू आहे; तर पणन महासंघाची जळगाव जिल्ह्यात खरेदी सुरू आहे. काही केंद्र अजून बंदच आहेत. पूर्ण केंद्र सुरू नाहीत. काही केंद्रांमध्ये आता कापूस विक्रीसाठी मोठी गर्दी होईल. कारण बाजारात कापसाचे दर ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. त्याचा फटका बसत असल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्रात शेतकरी कापूस विक्रीसाठी येत आहेत. या केंद्रात मात्र शेतकऱ्यांना टोकन दिले जात नाहीत. 

टोकन दिले तर शेतकरी ज्या दिवशी कापसाची संबंधित केंद्रात तोलाई होईल, त्याच दिवशी कापूस विक्रीसाठी आणतील. यामुळे वाहनांच्या रांगाही केंद्रात लागणार नाहीत. केंद्रचालक काही वेळेस दिवसभरात ५० किंवा ६० वाहनांमधील कापसाचीच तोलाई किंवा लिलाव व नंतर खरेदी करतात. जेवढी तोलाई, खरेदी करायची असते, तेवढ्याच शेतकऱ्यांना रोज टोकन दिले तर केंद्रासमोर रांगा लागणार नाहीत.

शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. रांगांमुळे अनेकदा केंद्रात शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. वशिलेबाजीचे आरोप होतात. हे प्रकार टाळण्यासह शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी टोकन दिले जावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

येथे लागतात रांगा 
जळगाव, पारोळा, अमळनेर, जामनेर, नंदुरबार, शहादा, शिरपूर येथील केंद्रात टोकनअभावी वाहने, बैलगाड्यांच्या रांगा लागतात. दोन ते तीन दिवस रांगेत वाहने असतात. यात ट्रॅक्‍टर किंवा भाड्याच्या बैलगाडीसंबंधी शेतकऱ्यांना हकनाक भाडे द्यावे लागते. प्रतिदिन दोन ते दीड हजार रुपये भाडे असते. शिवाय जेवण, चहा आदींचा रोजचा खर्चही करावा लागतो. यामुळे आर्थिक फटका बसतो. 


इतर अॅग्रो विशेष
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...