agriculture news in Marathi cotton production will decline in country Maharashtra | Page 2 ||| Agrowon

देशात कापूस उत्पादन घटणार

चंद्रकांत जाधव
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

कापूस उत्पादनाबाबत देशात वेगवेगळे अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. अतिपावसामुळे राज्यातील कापूस उत्पादन कमी होऊ शकते. परंतु पुढे कोरडवाहू कापूस पिकातून उत्पादन चांगले मिळेल. देशात ३८० लाख गाठींपर्यंतचे उत्पादन अपेक्षित आहे. 
- अनिल सोमाणी, माजी सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणातील पूर्वहंगामी कापूस पिकाला अतिपावसाने झोडपले. परिणामी, कापसाच्या उत्पादनात सुमारे ४० ते ४५ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) घट येण्याची शक्‍यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणातील कापूस उत्पादन मात्र अनुकूल हवामानामुळे बऱ्यापैकी साध्य होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

देशात १२७ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे ४४ लाख, गुजरातेत २६ लाख, उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये मिळून १६ लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. लागवडमागील हंगामापेक्षा अधिक व ऑक्‍टोबरपर्यंत पावसाबाबत स्थिती बऱ्यापैकी राहिली. परंतु ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नंतर दिवाळीपर्यंत पाऊस सुरूच राहिला. महाराष्ट्रातील कापूस पट्ट्याला मागील आठवड्यातही पावसाने झोडपले. सुरुवातीला देशात कापसाचे ४०० ते ४१२ लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज कापूस उद्योग, व्यापार जगतातील विविध संस्थांनी व्यक्त केला होता.

पण कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरातमध्ये अतिपावसामुळे पूर्वहंगामी कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. गुजरातेत कापसाखालील सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्र तर महाराष्ट्रातील सुमारे १७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. अर्थातच मे अखेरच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कापूस पिकात बोंडे काळवंडने, फांद्या तुटणे, पाते गळ असा प्रकार झाला आहे. अनेक पूर्वहंगामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस पिकात ३५ ते ४० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात घट निश्‍चित मानली जात आहे.

देशात ३५४ ते ३६० लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते. दक्षिण, मध्य भारतात पूर्वहंगामी कापसाचे पीक जोमात आहे. परंतु, त्यात वेचणी अपवादानेच सुरू आहे. या क्षेत्रात किती उत्पादन हाती येईल? पुढे गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढेल का? वातावरणाची स्थिती कशी असेल? असे प्रश्‍न कायम असल्याने कोरडवाहू कापसाच्या क्षेत्रातून उत्पादनासंबंधी ठोस अंदाज, माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे. 

सध्या पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी रखडत सुरू आहे. खानदेश, गुजरातेत अनेक जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू देखील झाले. परंतु अतिपावसाने सरकीचा दर्जा घसरला आहे. सरकीमध्ये १२ ते १४ टक्के आर्द्रता अपेक्षित असते. पण प्रतिकूल हवामानामुळे ही आर्द्रता ३५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. यामुळे सरकीचा उठाव मागील पंधरवड्यात हळूहळू कमी होत गेला. यामुळे सरकीचे दर ३३०० रुपये क्विंटलवरून २५०० रुपये क्विंटलपर्यंत आले आहेत. सरकीचे दर खाली येताच खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४१ हजार रुपयांवरून ३९ हजार रुपयांवर आले आहेत.

सरकीच्या दरात घसरणीमुळे पूर्व गुजरात, खानदेशातील जिनींग प्रेसिंग कारखानदारांना सुमारे ४० ते ४५ कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मिळाली. यातच देशात या हंगामात साडेअकरा कोटी क्विंटल सरकीच्या उत्पादनाची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली.

कापूस उत्पादनाबाबत वेगवेगळे अंदाज
देशात कापूस उत्पादनाबाबत कापूस व्यापार, उद्योग जगतातील विविध संस्थांचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने भारतात कापूस उत्पादन कमी येईल, असे म्हटले आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानेदेखील उत्पादन ३५४ लाख गाठींपर्यंत अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. उत्तर भारतातील कापूस व्यापार संघटनेने (गुरुग्राम, हरियाणा) नुकत्याच गुरुग्राम येथे झालेल्या दोन दिवसीय परिषदेत भारतातील कापूस उत्पादन ४०० लाख गाठींवर जाईल, असा दावा केला आहे. गुजरातमधील संघटनेने भारतातील कापूस उत्पादन ४१२ लाख गाठींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनने देशात ३८० ते ३८२ लाख गाठींच्या उत्पादनाबाबत माहिती जारी केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....
मोसंबी कलमांची दुप्पट विक्री औरंगाबाद : पाण्याच्या उपलब्धतेबाबत सुखद...