आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रोमनी
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा सुधारित अंदाज
जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता राहिल्याने गुजरात, महाराष्ट्र व तेलंगणातील कापूस पिकाला जबर फटका दिला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत कापूस गाठींचे (एक गाठ : १७० किलो रुई) उत्पादन तब्बल ३० लाख गाठींनी कमी होईल. एकट्या गुजरातेत २० लाख, तर महाराष्ट्रात १० ते १२ लाख गाठी घटतील. देशांतर्गत बाजारात रुईचा तुटवडा भासण्याचे संकेत मिळत आहेत.
जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता राहिल्याने गुजरात, महाराष्ट्र व तेलंगणातील कापूस पिकाला जबर फटका दिला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत कापूस गाठींचे (एक गाठ : १७० किलो रुई) उत्पादन तब्बल ३० लाख गाठींनी कमी होईल. एकट्या गुजरातेत २० लाख, तर महाराष्ट्रात १० ते १२ लाख गाठी घटतील. देशांतर्गत बाजारात रुईचा तुटवडा भासण्याचे संकेत मिळत आहेत.
गुजरातेत मागील हंगामात १०३ लाख गाठींचे, महाराष्ट्रात ८५ लाख गाठींचे उत्पादन झाले. परंतु कमी पावसाचा फटका या दोन्ही राज्यांना बसला आहे. जसा हंगाम पुढे सरकला तसे हंगामासंबंधीचे अंदाज चुकत असल्याचे समोर आले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने सुरवातीला २६० लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला होता. नंतर ३४८ लाख गाठींचे उत्पादन येईल, असे सांगितले.
कापसाला फटका बसल्याचे स्पष्ट होत असतानाच ३४३ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आला. तर आता ३३५ ते ३४० लाख गाठींचे उत्पादन देशात येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. देशाला सर्वाधिक कापूस गाठींचा पुरवठा करणाऱ्या गुजरातेत ८० ते ८५ लाख गाठी आणि महाराष्ट्रात ७० ते ७५ लाख गाठींचे उत्पादन येऊ शकते. नवा कापूस हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले, पण या दोन्ही राज्यांमध्ये हवी तशी कापूस आवकच नसल्याचे समोर आले आहे.
रुईचा तुटवडा मिलांना भासू शकतो. कारण देशातील मिलांना हंगामाअखेरपर्यंत ३६० लाख गाठींची आवश्यकता आहे. नॉन टेक्सटाइल गरजही (कन्झमशन) ६७ लाख गाठींपर्यंत आहे. जागतिक बाजारात भारतीय खंडीला (३५६ किलो रुई) ८१ सेंटचे दर आहेत. २९ मिलिमीटर लांब धाग्याची ही रुई किंवा कापूस आहे. तर ब्राझील व आफ्रिकेतील रुईदेखील २९ मिलिमीटर व त्यापेक्षा अधिक लांब धाग्याची आहे. तेथील रुईलाही भारतीय रुईएवढेच दर आहेत.
डॉलरचे दर मागील २५ ते २६ दिवसांत रुपयाच्या तुलनेत चार रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे तुर्की, इंडोननेशिया व व्हीएतनामसारखे आयातदार ब्राझील व आफ्रिकेच्या रुईला पसंती देत आहेत. ब्राझील यंदा १.१२ दशलक्ष मेट्रिक टन रुईची निर्यात करणार आहे. देशात कापूस दर मात्र स्थिर असून, खंडीचे दर ४४००० रुपये आहेत. तर सरकीचे दरही २१५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.
पाकिस्तानसमोर वित्तीय संकट
पाकिस्तानात मिलांसह कापड उद्योगात वित्तीय संकट आले आहे. पाकिस्तानची क्रयशक्ती अतिशय खालावली असून, सुमारे ५३ दिवसात पाकिस्तानचा रुपया डॉलरच्या तुलनेत १८ रुपयांनी घसरला आहे. सध्या पाकिस्तानला एक डॉलर १४२ रुपयांत पडत आहे. पाकिस्तानकडून सध्या कापूस आयात ठप्प असल्याचे सांगण्यात आले. ३३ लाख गाठींचा आयात लक्ष्यांक पाकिस्ताननने हंगामाच्या सुरवातीला ठेवला होता. परंतु एवढी आयात पाकिस्तान करील की नाही, हा मुद्दा जाणकार उपस्थित करीत आहेत.
भारतात गुजरातमध्ये २० लाख गाठींचे उत्पादन कमी येईल. तर महाराष्ट्रातही किमान १० लाख गाठी कमी येतील. ३३५ ते ३४० लाख गाठींचे उत्पादन येईल. उत्पादन कमी येताना दिसत असले तरी वस्त्रोद्योगाला वित्तीय संकटांचा सामना करावा लागत असल्याने उलाढाल हवी तशी नाही.
- अनिल सोमाणी,
सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
- 1 of 31
- ››