agriculture news in marathi, cotton productivity at quintal 31 kg in Nanded, Maharashtra | Page 4 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता प्रतिहेक्टरी ८ क्विंटल ३१ किलो

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

कृषी विभागातर्फे गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रभावीपणे जनजागृती मोहीम राबविण्यात आली शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तसेच वेळीच कीड व्यवस्थापन केले. त्यामुळे कपाशीच्या उत्पादकता वाढीस मदत झाली.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामात कपाशीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ८ क्विंटल ३१ किलो (एकरी ३ क्विंटल ३२ किलो) एवढी आली आहे. जिल्ह्याच्या गेल्या पाच वर्षांतील कपाशीच्या प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकतेपेक्षा यंदाची उत्पादकता २ क्विंटल ५१ किलोने जास्त आली आहे. परंतु दुष्काळी स्थितीमुळे देगलूर, उमरी, हदगांव या तीन तालुक्यांची उत्पादकता सरासरीपेक्षा कमी आली आहे. संयुक्त पीक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षाच्या विश्लेषणानंतर हे आढळून आले. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

यंदा कपाशीची उत्पादकता काढण्यासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये ५८८ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५८६ पीक प्रयोगाचे निष्कर्ष विश्लेषित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ८.३१ किलो (एकरी ३.३२ क्विंटल) आल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्याची २०१३ ते २०१७ या पाच वर्षांतील कपाशीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ७९ किलो आहे.

सरासरी उत्पादकतेपेक्षा यंदाची उत्पादकता २ क्विंटल ५१ किलोने जास्त आहे. यंदा रुईचे प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन २ क्विंटल ९१ किलो आले आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांपैकी देगलूर, उमरी, हदगांव या तालुक्यांची कपाशीची उत्पादकता सरासरी उत्पादकतेपेक्षा ७३ किलो ते २.९९ क्विंटलने कमी आली आहे. उमरी तालुक्यात एकरी ९४ किलो, देगलूर तालुक्यात एकरी १ क्विंटल १३ किलो, हदगाव तालुक्यात एकरी २ क्विंटल २६ किलो आली आहे.

अर्धापूर तालुक्यात प्रतिहेक्टरी सर्वाधिक म्हणजेच १७ क्विंटल १४ किलो (एकरी ६ क्विंटल ८५ किलो) एवढी तर उमरी तालुक्यात सर्वात कमी प्रतिहेक्टरी २ क्विंटल ३५ किलो (एकरी ९४ किलो) एवढी उत्पादकता आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
ग्लायफोसेटच्या थेट वापरावर बंदीच्या...पुणे: अलीकडील वर्षांत सातत्याने चर्चेत असलेल्या...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...