Agriculture news in Marathi cotton purchase in Akola district from today | Agrowon

अकोला जिल्ह्यात 'पणन'ची आजपासून कापूस खरेदी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

अकोला ः जिल्ह्यात कापूस केंद्रावर शुक्रवार (ता. २४) पासून खरेदी सुरू केली जात आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या केंद्रावर कामकाज चालणार आहे. विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करणे गरजेची असून यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

अकोला ः जिल्ह्यात कापूस केंद्रावर शुक्रवार (ता. २४) पासून खरेदी सुरू केली जात आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या केंद्रावर कामकाज चालणार आहे. विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करणे गरजेची असून यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस विक्री व्हायचा असून पणन महासंघ व सीसीआयने कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आलेली आहे. आता लॉकडाऊनमध्ये या भागात थोडी शिथिलता असल्याने पुन्हा खरेदी सुरू केली जात आहे. 

पणन महासंघाची जिल्ह्यातील केंद्र शुक्रवारपासून सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यासाठी अटी घालून देण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने कापूस खरेदी फक्त अकोला जिल्ह्यातील पणन महासंघाकडे नोंदणी झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील खरेदी केला जाईल. यासाठी रहिवास पुरावा द्यावा लागेल. 

शेतकऱ्यांना सातबारा, बॅंक पासबुक, आधारकार्ड सोबत ठेवावे लागेल. पणन महासंघाच्या बोरगावमंजू केंद्रावर ६८५ तर कानशिवणी केंद्रावर ४२३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीनंतरच पुढील नोंदणी सुरू करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक खरेदीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी खरेदी केंद्रावर टप्प्या टप्प्याने शेतकरी येतील असे नियोजन करण्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी निर्देश दिले आहेत. 

या विभागात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू केले जात आहेत. कोरोनामुळे विशेष खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळत खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात एक केंद्र सुरू झाले. टप्याटप्प्याने इतरही ठिकाणी खरेदी सुरू केली जाईल. सध्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे. 
- अजयकुमार, जनरल मॅनेजर, सीसीआय


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...