Agriculture news in marathi On cotton in Ralegaon Infestation of bollworm | Agrowon

राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर हंगामाच्या सुरुवातीलाच बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर हंगामाच्या सुरुवातीलाच बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला तर गेल्या हंगामाप्रमाणे या वेळी देखील पीक काढण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

 यवतमाळ जिल्ह्याचे खरीप लागवड क्षेत्र ९ लाख हेक्‍टरच्या आसपास आहे. यातील निम्म्या म्हणजेच पाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. सिंचन सुविधांचा अभाव असल्याने बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेतकरी या पिकाचे व्यवस्थापन करतात. गेल्या हंगामात जिल्ह्यात सर्वदूर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. काही भागात बोंडसडीमुळे पीक उध्वस्त झाले.

एकरी एक किलोची उत्पादकता देखील काही शेतकऱ्यांना झाली नाही. या उलट बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता पीक काढावे लागले. या सर्व उपायानंतर देखील या वर्षी पुन्हा बोंडअळीने डोकेवर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. राळेगाव तालुक्‍यातील निधा येथील शेतकरी डॉ. ज्ञानेश्वर मुडे यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबीबोंड अळी दिसून आली. डॉ. मुडे यांनी लागवडीनंतर पिकाचे शिफारशीनुसार व्यवस्थापनावर भर दिला होता. सद्यःस्थितीत त्यांचे पीक फुलांवर आहे. मात्र २७ पैकी दहा एकर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळी दिसून आल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

कृषी अधिकाऱ्यांकडे कंपनीविरोधात तक्रार
या संदर्भाने त्यांनी राळेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे रीतसर तक्रार केली. त्यामध्ये कंपनीने केलेल्या दावा खोटा ठरल्याचे म्हटले आहे. कंपनीने ९० दिवसांत कोणत्याही कीडरोगाचा प्रादुर्भाव होणार नसल्याचा दावा केला होता. परंतु पीक लागवडीला ४५ ते ६० दिवस झाले असतानाच पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने बियाणे कंपनीवर कारवाईची मागणी त्यांनी केली.

या तक्रारीची दखल कृषी विभागाने घेत तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत होते. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तहसीलदार यांनी या विषयाची गंभीरता लक्षात घेत तातडीने उपाययोजनांसाठी पंचायत आणि तालुका कृषी विभागाची संयुक्‍त बैठक बोलावली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...