agriculture news in Marathi cotton rate at 5100 rupees in KhandeshMaharashtra | Agrowon

जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी झाली. सध्या महाशिवरात्री व बॅंका बंद असल्याने खेडा खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमधील प्रक्रियेला मात्र वेग आल्याची स्थिती आहे. 

जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी झाली. सध्या महाशिवरात्री व बॅंका बंद असल्याने खेडा खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमधील प्रक्रियेला मात्र वेग आल्याची स्थिती आहे. 

खानदेशात अनेक शेतकरी शासकीय केंद्रात कापूस विक्रीला पसंती देत आहेत. कारण, या केंद्रात कापसाला किमान ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. परंतु, खेडा खरेदीतही दर्जेदार कापसाला ५१०० पर्यंतचा दर जागेवरच मिळत असल्याने काही शेतकरी खेडा खरेदीत कापूस विक्री करीत आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून खेडा खरेदीची गती मंद झाली आहे.

कारण, बॅंका शुक्रवारपासून (ता. २१) रविवारपर्यंत (ता. २३) बंद असतील. खेडा खरेदीत शेतकऱ्यांना रोखीने पैसे दिले जातात. धनादेश शेतकरी स्वीकारत नाहीत. यामुळे खरेदीदार हात राखून किंवा कमी खरेदी करीत आहेत. खानदेशात सुमारे ९१ जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत.

सध्या धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील जळगाव, रावेर, यावल व चोपडा भागांतून दर्जेदार कापूस उपलब्ध होत असल्याने या भागात मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानदारांचे एजंट कापूस खरेदी करून घेत आहेत. जळगाव व धुळ्यात मिळून रोज १८ ट्रक (एक ट्रक आठ मेट्रिक टन क्षमता) कापसाची खेडा खरेदी सुरू आहे.

मागील तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने काही जिनिंग प्रेसिंग कारखान्यात कापसासह सरकीचा साठा रिकामा करून घेतला जात असून, प्रक्रिया वेगात सुरू आहे. जिनिंग प्रेसिंग कारखान्यात आवक झालेल्या कापसावर लागलीच प्रक्रिया करून घेण्यात येत आहे. 

दरांवर दबाव नाही
भारतीय कापूस महामंडळाची धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेरातील शेंदूर्णी, पहूर, बोदवड, भुसावळ येथे कापूस खरेदी सुरू आहे. तर पणन महासंघाची खरेदी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, धुळे, मालेगाव (जि. नाशिक) येथे सुरू आहे. यामुळे कापूस दरांवर कुठलाही दबाव सध्या दिसून येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. 


इतर अॅग्रो विशेष
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...