agriculture news in Marathi cotton rate up in kheda kharedi Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खेडा खरेदीत कापूसदरात वाढ

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून, दर्जेदार कापसाला गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे.

जळगाव ः कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून, दर्जेदार कापसाला गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे. देशात शेतकऱ्यांकडे आजघडीला सुमारे ९५ लाख गाठी कापूस शिल्लक आहेत. तर बाजारात २२५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे.

देशभरातील सर्वच कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळत नसल्याचे दिसत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा साठा घरात ठेवला आहे, त्या सुमारे ३० टक्के कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ‘सीसीआय’ला या दरवाढीचा चांगला लाभ होत आहे. कारण ‘सीसीआय’ने ऑक्टोबरमध्येच शासकीय कापूस खरेदी देशात ४३० केंद्रांमध्ये सुरू केली होती. गेल्या आठवड्यापर्यंत ‘सीसीआय’ने देशभरात ९० लाख गाठी एवढ्या कापसाची खरेदी शासकीय केंद्रांच्या माध्यमातून केली आहे. सीसीआय’च्या खंडीचे (३५६ किलोची एक खंडी) ई लिलाव सुरू असून, खंडीला उच्चांकी ४४ हजार रुपये दर मिळत आहे. 

यूएसडीएच्या अहवालानंतर दरवाढ
अमेरिकन कृषी विभागाने अलीकडेच कापूस उत्पादनासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात अमेरिकेचे कापूस उत्पादन २०१९-२० च्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी म्हणजेच २२५ लाख गाठींपर्यंत असू शकते, असे म्हटले आहे. शिवाय जगभरात कापूस उत्पादन कमी असल्याचे नमूद केले. 

सध्याचे शिवार खरेदीतील दर असे...
कापसाला कमाल ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे. ज्या शेतकऱ्याकडे ६० ते १५० क्विंटल कापूस आहे, त्या शेतकऱ्याला किमान ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे. तसेच यापेक्षा कमी कापूस साठा असलेल्या शेतकऱ्याला ५६५०, ५७०० व ५८०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळत आहे. पहिल्या तीन-चार वेचण्यांच्या कापसाला चांगला दर आहे. 

जगभरात कापसाला मागणी अधिक
जगात यंदा २५ दशलक्ष टन कापूस उत्पादन होणार आहे. जेवढे उत्पादन होईल, तेवढ्या कापसाची मागणी, खरेदी होणार आहे. शिवाय जगात कापूससाठा संपत आला आहे. यामुळे कापूस दरांत तेजी आहे. जगात यंदा हंगामअखेर सुमारे २० दशलक्ष टन कापूस साठा राहील, असे संकेत होते. परंतु हा साठा अनेक वर्षांमधील नीचांकी स्थितीत राहण्याची शक्यता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासह जाणकारांनी व्यक्त केली आहे. परिणामी कापूस बाजाराने उसळी घेतली आहे. 

सरकी दरात सुधारणा
सरकीचे दर गेल्या महिन्यात २३५० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. सध्या सरकीचे दर २६५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. अर्थातच पंधरवड्यात सरकी दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ झाली आहे. पशुखाद्यासह खाद्यतेलासाठी सरकीची मागणी देशात वाढली आहे. कारण सोयाबीनचा तुटवडा असून, सोयाबीन तेलही तेजीत आहे. 

प्रतिक्रिया
मी ‘अॅग्रोवन’च्या व्यासपीठाच्या माध्यमातून कापूस दरवाढ जानेवारीत होईल, यंदा चांगली निर्यात देशातून होईल, कापसाचे भवितव्य चांगले आहे, असे म्हटले होते. हे भाकीत खरे ठरले आहे. देशातून सुमारे २२ लाख गाठींची निर्यात बांगलादेशसह आशियाई देशांत झाली आहे. निर्यात सुरूच आहे. कोरोनाचे संकट कापूस उद्योगासमोरून दूर झाले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने कापूस उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे म्हटले आहे. चांगली मागणी रुई, सरकी, सुताला असल्याने ही दरवाढ झाली आहे. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, पीक समिती
 


इतर अॅग्रो विशेष
प्रतिकारशक्ती वाढीसाठी बेदाण्याचा वापर...सांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ...
मर्यादित संशोधनामुळे रंगीत कापसाचा...नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन...
इंडो-डच फूल संशोधन प्रकल्पाला गती पुणे ः इंडो-डच प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन...
गूळ पावडरची अमेरिकेला निर्यात पुणे ः राज्य शासनच्या वतीने कृषी उद्योजकतेसाठी...
कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत नाशिक : जिल्ह्यात बाजारात खरीप हंगामातील नवीन लाल...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
थंडीत चढ-उतार पुणे ः अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रीय...
शेतीमध्ये बदलली पीक पद्धतीमादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप...
बायोस्टिम्युलंट्‍स’- कायद्याच्या कक्षेत...बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख...
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
तीन लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी...मुंबई : नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून...
इथेनॉल उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले पुणे : तेल कंपन्यांची साठवणक्षमता अपुरी पडत...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...