मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंत
मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंत

मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंत

अकोला : बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे अतोनात नुकसान झालेले असताना अाता कापसाचे दर सुधारत अाहेत. दरांमध्ये अागामी दोन महिन्यांत अाणखी सुधारणा होण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून व्यक्त होऊ लागला अाहे. हंगामात सुरवातीला ३८०० ते ४००० पर्यंत स्थिरावलेले कापसाचे दर अाता काही दिवसांपासून सातत्याने सुधारत अाहेत.  या हंगामात राज्यात कपाशीचे सुमारे ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झालेली अाहे. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकता घटली असून ज्यांना कापूस येत अाहे, अशांच्या मालात (कपाशी) कवडीचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक अाहे. तरीही बाजारपेठेत मागणी असल्याने कापसाचे दर साडेचार ते पाच हजार दरम्यान मिळू लागले अाहेत.   कापूस पिकाचे नुकसान झाल्याने त्याचा परिणाम साहजिकच कापूस गाठीच्या उत्पादनावर पडणार अाहे. या हंगामात दरवर्षीच्या तुलनेत ५० लाख गाठींपेक्षा अधिक उत्पादन कमी होण्याची चिंता भेडसावत अाहे. दुसरीकडे अाताच्या परिस्थितीत देशासह विदेशी बाजारपेठेतही कापसाची मागणी वाढत असल्याचे सांगितले जात अाहे. याच कारणांनी कापसाच्या दरांमध्ये तेजी येऊ लागली अाहे. विदर्भात कापसाची प्रमुख बाजारपेठ म्हणून अोळख असलेल्या मलकापूर (जि. बुलडाणा) येथील बाजारात ४७०० ते ५००० रुपये क्विंटलने खरेदी केल्या जात अाहे. इतरत्रही साडेचार हजारांपेक्षा अधिक क्विंटलला दर मिळू लागला अाहे.   मलकापूर येथील बाजारात कापूस ४७०० ते पाच हजार रुपये क्विंटलने खरेदी केला जात अाहे. अामच्या जिनिंगमध्ये दररोज दोन हजार ते अडीच हजार क्विंटलची अावक अाहे. इतरांकडेही अशीच अावक अाहे. बाजारपेठेत मागणी असल्याने चांगल्या दर्जाच्या कापसाला पाच हजारांपर्यंत दर दिला जात अाहे. येत्या दोन महिन्यांत अाणखी दरवाढीची शक्यता अाहे.  - त्रिलोकचंद दंड, विरचंद नसरी कॉटन, मलकापूर, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com