agriculture news in marathi cotton rate situation challenging | Agrowon

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिती आव्हानात्मक

मनीष डागा 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सुध्दा बाजाराचा अंदाज वर्तवणे कठीण होत आहे. २०१९ मध्ये कापूस, रूई, सूत आणि कापड यांच्या बाजारात एवढ्या उलथापालथी झाल्या की अनुभवी विश्लेषक आणि व्यापाऱ्यांनाही चकवा खावा लागला. २०१८-१९ मध्ये कापसाच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे कापसाच्या दरात तेजी येण्याचा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र तेजीऐवजी मंदीचा सामना करावा लागला. या मंदीचा मोठा फटका व्यापारी, जिनर्स, सूतमिल आणि शेतकऱ्यांना बसला.

कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सुध्दा बाजाराचा अंदाज वर्तवणे कठीण होत आहे. २०१९ मध्ये कापूस, रूई, सूत आणि कापड यांच्या बाजारात एवढ्या उलथापालथी झाल्या की अनुभवी विश्लेषक आणि व्यापाऱ्यांनाही चकवा खावा लागला. २०१८-१९ मध्ये कापसाच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे कापसाच्या दरात तेजी येण्याचा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र तेजीऐवजी मंदीचा सामना करावा लागला. या मंदीचा मोठा फटका व्यापारी, जिनर्स, सूतमिल आणि शेतकऱ्यांना बसला.

२०१९-२० या हंगामात कापूस लागवडीचे वाढलेले प्रमाण आणि सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दिलेली चांगली साथ यामुळे कापूस उत्पादन ४०० लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु पूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कापूस उत्पादनाचा अंदाज आता ३५५ ते ३६० लाख गाठींवर आला आहे. कापसाची गुणवत्ता आणि गुजरातमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढचं चित्र काय असेल याबद्दल चिंता वाढली आहे.

कॉटन ॲडव्हायजरी बोर्डाने(सीएबी) २८ नोव्हेंबर रोजी कापूस उत्पादन आणि खप याविषयीचा अहवाल जाहीर केला. त्याची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

 • २०१८-१९ मधील कापूस उत्पादनाचा अंदाज ३३७ लाख गाठींवरून ३३० लाख गाठी करण्यात आला आहे.
 • २०१९-२० मध्ये ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 • २०१८-१९ मध्ये १२६.५८ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. तर २०१९-२० मध्ये १२५.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली. थोडक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात १ टक्का घट झाली.
 • २०१८-१९ मध्ये कापसाची उत्पादकता प्रति हेक्टर ४४३.२० किलो इतकी होती. तर २०१९-२० मध्ये हेक्टरी ४८६.३३ किलो उत्पादकता अपेक्षित आहे.
 • रूईच्या खपाचा अंदाज ३०५ लाख गाठींवरून ३२१ लाख गाठी करण्यात आला आहे.

कापसाच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सगळं काही आलबेल आहे, असं हा अहवाल बघितला तर वाटतं. परंतु जमिनीवरचं वास्तव मात्र वेगळं आहे. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, अवकाळी पाऊस आणि मागणीत झालेली घट यामुळे कापूस, रूई, सूत आणि कापड बाजाराची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे.

‘कॉटनगुरू’ला आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत :

 • जस्टॲग्री या खासगी कंपनीच्या माहितीनुसार नवीन कापूस हंगामात २६ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ४३ लाख गाठी कापसाची आवक झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ६५ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. याचा अर्थ कापसाच्या आवकेत ४० टक्के घट झाली आहे.
 • या हंगामात आवक झालेल्या कापसापैकी सुमारे ८० टक्के कापूस कमी गुणवत्तेचा आहे. अवकाळी पावसामुळे कापसाची आवक आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम झालेला आहे.
 • दरवर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतातील निर्यातदार २० ते ३० लाख गाठी कापूस निर्यातीचे सौदे करत असतात. परंतु यंदा मात्र पाच लाख गाठींपेक्षा अधिक कापसाचे सौदे झाल्याचे ऐकिवात नाही.
 • चीन-अमेरिका व्यापारयुद्धामुळे सूत आणि कपड्याच्या निर्यातीत घट झाल्याचे आढळून आले आहे.
 • गेल्या हंगामात झालेल्या नुकसानामुळे जिनर्स आणि मिल धारकांची स्थिती अजूनही कमजोर दिसत आहे.
 • अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादन आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे शेतकरीसुध्दा त्रासून गेले आहेत.
 • मिल्सचे जीएसटी व अनुदान परतावे दीर्घकाळापासून रखडले आहेत.
 • कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ने कापूस खरेदी आणि बियाणे विक्रीसंदर्भात एकतर्फी नियम बनवल्यामुळे जिनर्स आणि मिल्सच्या अडचणींत वाढ झाली आहे.

या सगळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था सर्वाधिक नाजूक आहे. कापसाला प्रति क्विंटल ५५०० रुपये किमान आधारभूत जाहीर करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत खासगी खरेदीदार प्रति क्विंटल २५०० ते ५२०० रुपये या दरम्यान दर देत आहेत. हमीभावाने सरकारी खरेदीचे घोडे फारसे पुढे सरकलेले नाही. गेल्या दोन महिन्यांत ‘सीसीआय''ने केवळ १ टक्का कापूस खरेदी केला आहे. शेतकऱ्याला कापसाचा उत्पादनखर्च भरून निघणेही मुश्किल झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘कॉटनगुरू''ने १५ नोव्हेंबर, २०१९ रोजी औरंगाबाद येथे १३ फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची (एफपीसी) बैठक घेऊन कापसाची मार्केटिंग आणि बाजाराचा कल या विषयावर मार्गदर्शन केले. आजघडीला शेतकऱ्यांसाठी सीसीय हाच प्राथमिक खरेदीदार असणार आहे; त्यामुळे ‘सीसीआय''च्या अटी आणि शर्तींप्रमाणेच कापूस विक्री करावी लागणार आहे, असे या वेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले. कापसाचा दुसरा मोठा खरेदीदार म्हणजे जिनर्स. चांगल्या गुणवत्तेच्या मालाला जिनर्सकडून अधिक भाव मिळतो. ‘कॉटनगुरू''ने या बैठकीसाठी ‘सीसीआय''चे पदाधिकारी आणि देशातील बडे जिनर्स यांना आमंत्रित केले होते. त्यांचे मागर्दर्शन उपयुक्त ठरले. तसेच एफपीसी प्रतिनिधींची जिनर्ससोबत थेट कापूस विक्रीबाबतही चर्चा झाली.

(लेखक कापूस बाजार विश्लेषक व ‘कॉटनगुरू'चे प्रमुख आहेत.)


इतर अॅग्रोमनी
साखरेच्या निर्यात योजनेत लवचिकताकोल्हापूर : यंदा साखर जास्तीत जास्त निर्यात...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन... पुणे ः प्रतिकूल हवामानामुळे  ...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
आधारभावाअभावी मक्याची परवडचालू हंगामासाठी केंद्र सरकारने मक्याला १८५० रुपये...
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...
कापसाच्या दरात सुधाराची चिन्हेपुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३००...
केंद्रीय अर्थसंकल्पातून होणार सवलतींची...नवी दिल्ली ः कोरोनाच्या संसर्गामुळे...
मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच...शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत...
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर...कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे....
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ...कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना...
सुताच्या दरात मोठी वाढजळगाव ः जगभरातील प्रमुख आयातदारांकडून सुताची मोठी...
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी...