Agriculture News in Marathi Cotton scarcity in the country | Page 5 ||| Agrowon

देशात कापूस टंचाई 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 जानेवारी 2022

देशात कापूस दरात तेजी येताच शेतकऱ्यांनी कापूस विक्री सुरू केली आहे. कापूस आवकेत काहीशी वाढ गेल्या दोन दिवसांत दिसत आहे. उत्तर भारतातील बाजारांमध्ये कापसाचे कमाल दर १० हजार रुपये प्रति क्विंटलवर पोचले आहेत.

जळगाव ः देशात कापूस दरात तेजी येताच शेतकऱ्यांनी कापूस विक्री सुरू केली आहे. कापूस आवकेत काहीशी वाढ गेल्या दोन दिवसांत दिसत आहे. उत्तर भारतातील बाजारांमध्ये कापसाचे कमाल दर १० हजार रुपये प्रति क्विंटलवर पोचले आहेत. तरीही कापूस टंचाई तयार झाली असून, सूतगिरण्या रुईच्या विस्कळित पुरवठ्याने अडचणीत आल्या आहेत. सूतगिरण्यांना रोज दीड लाख गाठींची गरज आहे, पण तितका पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे. दाक्षिणेकडील गिरण्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण कापूस आवक वाढत असल्याने पुढे रुईच संकट काहीसे कमी होऊ शकते, असे जाणकार सांगत आहेत. 

देशातील बाजारात कापूस आवकेत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट नोंदविण्यात आली आहे. कापूस उत्पादन ३५० लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७०किलो रुई) पोचेल की नाही, असा मुद्दाही उपस्थित होत आहे. डिसेंबरमध्ये प्रति दिन सरासरी पावणेदोन लाख गाठींची आवक देशातील बाजारांमध्ये झाली. किमान तीन लाख गाठींची आवक अपेक्षित होती. पण आवकेत सतत घट येत होती. पण गेल्या वर्षाच्या अखेरीस दरात सुधारणा होताच शेतकऱ्यांनी देखील कापूस विक्रीला वेग दिला आहे. त्यामुळे बाजारात सुमारे २५ हजार गाठींची आवक वाढली असून, आवक दोन लाख गाठींवर गेली आहे.

आवकेत आणखी वाढ होईल. कारण महाराष्ट्रात कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे. सध्याची आवक ६० हजार गाठी प्रति दिन इतकी आहे. पण पुढे ही आवक ८० हजार गाठी प्रति दिन होईल, अशी अपेक्षा आहे. कारण कापसाची खेडा खरेदी आणि शेतकऱ्यांकडून बाजारात विक्री गेल्या तीन दिवसांत वाढली आहे. खंडीचे दर (३५६ किलो रुई) ७० हजार रुपयांवर पोचले आहेत. खंडीचे किमान दर ६९ हजार रुपये, असे आहेत. देशांतर्गत बाजारातही रुईला चांगला उठाव आहे. 

सुविनचे दर सर्वोच्च 
३१ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापसापासून तयार झालेल्या ओरिसातील सुविन रुईचे दर ८५ हजार रुपये प्रति खंडिवर आहेत. तेथील कापसाला दाक्षिणात्य बाजारात मोठी मागणी आहे. तेथे आवकही बऱ्यापैकी आहे. या पाठोपाठ मध्य प्रदेशातील डीसीएच प्रकारच्या रुईला देखील ७८ हजार रुपये खंडीपेक्षा अधिकचे दर आहेत. गुजरातमधील शंकर सहा कापसाच्या या गाठी किंवा रुईला देखील ७२ हजार रुपये प्रति खंडीपेक्षा अधिक दर आहेत. 

उत्तरेकडील आवक घटणार 
उत्तर भारतातील कापूस हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू झाला. डिसेंबरमध्ये तेथे कापसाखालील क्षेत्र रिकामे झाले. तेथे कमाल कापसाची विक्री शेतकऱ्यांकडून झाली आहे. राजस्थान, हरियाना व पंजाबमध्ये सध्या मिळून प्रति दिन २५ हजार गाठींची आवक होत आहे. तेथे ही आवक पुढे कमालीची घटू शकते. तेथे उत्पादनातही मोठी घट आल्याचे सांगण्यात येत आहे. किमान ५४ लाख गाठींचे उत्पादन उत्तर भारतात अपेक्षित असते. पण तेथे एवढे उत्पादन यंदा येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. 

प्रतिक्रिया 

कमी आवक आणि देशातील चांगल्या मागणीमुळे कापसाची दरवाढ झाली आहे. सध्या कापूस विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. महाराष्ट्रात किमान ७० टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे. आवकेत वाढ दिसत असल्याने बाजारातील पुरवठ्याचे गणितही सुधारले आहे. पण पुढे कापूस आवकेत घट होईल. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती) 


इतर बातम्या
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...
'AI' च्या मदतीने कापसाचे विक्रमी...तेलंगणात या खरीप हंगामात कापसाला  (Cotton)...
दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय...दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने...
महाराष्ट्रात ११ महिन्यांत २४९८...  जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या ११...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
खानदेशात उन्हाळी बाजरी पेरणी रखडतजळगाव : खानदेशात उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे तीन...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...
कृष्णा खोऱ्यातील उर्वरित पाणी वर्षभरात...पुणे : कृष्णा पाणीवाटप लवादाच्या पहिल्या...
सोयापेंड निर्यातीसाठी वाहतूक अनुदान...पुणे ः देशात यंदा सोयापेंडचे दर अधिक असल्याने...
कापूस मोजमापात पापवाशीम : शेतकऱ्यांना लुबाडणारी एक व्यवस्थाच तयार...
महावितरणने चालवलेली लूट थांबवा पुणे : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...