Agriculture news in marathi; Cotton season in saline belt is also in trouble | Agrowon

खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

अकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले असून खारपाण पट्ट्यातील गावांचे प्रमुख पीक असलेल्या कापसाचा हंगामही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पाऊस उघडताच शेतशिवारात उभ्या दिसत असलेल्या कपाशीची झाडे लाल पडत आहेत. शिवाय नवीन फूल, पात्या उगवण्याचे प्रमाणही थांबले आहे.

अकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले असून खारपाण पट्ट्यातील गावांचे प्रमुख पीक असलेल्या कापसाचा हंगामही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पाऊस उघडताच शेतशिवारात उभ्या दिसत असलेल्या कपाशीची झाडे लाल पडत आहेत. शिवाय नवीन फूल, पात्या उगवण्याचे प्रमाणही थांबले आहे.

जिल्ह्यात या वर्षी १ लाख ५१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दर चांगले मिळत असल्याने खारपाण पट्ट्यात मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी सोयाबीनला सोडचिठ्ठी देत कापसाला पसंती दिली. यामुळे सर्वत्र कापसाची लागवड दिसून येते. हंगामात लागवड झालेले पीक सुरुवातीला चांगले दिसत होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकाची वाढ होऊनही आता झाडांवर बोंडाची संख्या नगण्य आहे. शिवाय नवीन फुल, पात्या येणे थांबलेले आहे. झाडे दर दिवसाला लालसर होत आहेत. यामुळे पिकाचे उत्पादन फारसे येण्याची चिन्हे राहिलेली नाहीत. सध्या असलेले सर्व बोंड फुटत असून येत्या महिनाभरात हा हंगाम आटोपतो की, अशी भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

दरवर्षी आत्तापर्यंत एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत असतो. यंदा मात्र अनेकांचे मुहूर्त आता होऊ लागले.  एक किंवा दोन वेचणीमध्ये संपूर्ण कापूस निघण्याची चिन्हे आहेत. यामुळे डिसेंबरमध्ये कापूस पट्ट्यात ‘उलंगवाडी’ होण्याची शक्यताही वाढलेली आहे. काही शेतांमध्ये कपाशीचे पीक हिरवेगार दिसत असतानाच झाडांवर मात्र बोंड, पाते, फुलांची अत्यंत तोकडी आहे. आता हे पीक सुधारण्याची शक्यतासुद्धा तितकीशी दिसत नसल्याने या पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...