सरकीला विक्रमी ३३०० रुपये दर; उत्पादनात घटीमुळे दराला आधार

जळगाव ः देशात कापसाप्रमाणे सरकीचे देखील उत्पादन घटले असून, दर उच्चांकी पातळीवर म्हणजेच ३३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. वायदा बाजारातही सरकीचा साठा कमी आहे. परिणामी दर टिकून आहेत.
सरकीला विक्रमी ३३०० रुपये दर; उत्पादनात घटीमुळे दराला आधार
सरकीला विक्रमी ३३०० रुपये दर; उत्पादनात घटीमुळे दराला आधार

जळगाव ः देशात कापसाप्रमाणे सरकीचे देखील उत्पादन घटले असून, दर उच्चांकी पातळीवर म्हणजेच ३३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. वायदा बाजारातही सरकीचा साठा कमी आहे. परिणामी दर टिकून आहेत. सरकीचे दर गेल्या वर्षी मार्चमध्ये २२०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे होते. सरकीचा साठाही बऱ्यापैकी होता. त्याचा वापर वर्षभरात झाला. सरकीची मागणी देशात खाद्यतेलासह कुक्कुटपालनासंबंधीचे खाद्य व इतर बाबींसाठी वाढली आहे.  कारण सोयाबीनचे दर अधिक आहेत. त्याची आयात करावी लागत आहे. कुक्कुट उद्योगात सोयाबीनपासून तयार होणाऱ्या खाद्याची मागणी अधिक असते. परंतु यंदा सोयाबीन कमी उपलब्ध झाले. शिवाय त्याचे दर सरकीपेक्षा अधिक होते. यातच कोविड व इतर समस्यांमुळे कापसाची अधिकाधिक विक्री यंदा फेब्रुवारीपूर्वीच झाली. या दरम्यान कुक्कुट उद्योगाला लागणाऱ्या खाद्यासाठी सरकीचा वापर मोठा झाला. शिवाय खाद्यतेलासाठी देखील सरकीवर प्रक्रिया वेगात सुरू आहे. 

सरकीचे दर जानेवारीत २७०० रुपये प्रतिक्विंटल होते. यानंतर सतत दरवाढ झाली. मार्चच्या सुरवातीला दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे झाले. खाद्यतेल उद्योगात सरकीचा वापर यंदा वाढला आहे. कारण सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती मिळाली. सरकीचा तुटवडा आणि तेजीचा हंगाम देशात सुमारे ११०० ते १२०० कोटी क्विंटल सरकी उत्पादनाचा अंदाज होता. कापसाचे उत्पादन ३७० ते ३८० लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे येईल, असे विविध संस्था सांगत होत्या. परंतु उत्पादनात अतिपाऊस, गुलाबी बोंड अळी आदी कारणांनी घट आली. परिणामी सरकीचे उत्पादन ९०० ते ९६० कोटी क्विंटल एवढेच हाेईल, अशी स्थिती सध्या आहे. यामुळे सरकीच्या दरात मोठी तेजी आहे. तेजी पुढील हंगामापर्यंत कायम राहील, कारण सरकीचा साठाही वायदा बाजारात दिसत नसल्याची स्थिती आहे. सरकीच्या दरात पुढे आणखी वाढ होवू शकते, यामुळे पशुपालकांनी सरकी ढेपचा साठा करून घेण्याचे आवाहनदेखील बाजारपेठ विश्लेषकांनी केले आहे. प्रतिक्रिया... सरकीचे उत्पादन यंदा कापसाप्रमाणे घटले आहे. दरात वर्षभरात किमान एक हजार रुपयांची वाढ एक क्विंटलमागे झाली आहे. ही तेजी टिकून राहील. किंबहुना, आणखी दरवाढ होईल.  - अरविंद जैन, सदस्य,  कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com