agriculture news in marathi Cotton Seed rate reaching High in season | Page 2 ||| Agrowon

सरकीला विक्रमी ३३०० रुपये दर; उत्पादनात घटीमुळे दराला आधार

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

जळगाव ः देशात कापसाप्रमाणे सरकीचे देखील उत्पादन घटले असून, दर उच्चांकी पातळीवर म्हणजेच ३३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. वायदा बाजारातही सरकीचा साठा कमी आहे. परिणामी दर टिकून आहेत.

जळगाव ः देशात कापसाप्रमाणे सरकीचे देखील उत्पादन घटले असून, दर उच्चांकी पातळीवर म्हणजेच ३३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. वायदा बाजारातही सरकीचा साठा कमी आहे. परिणामी दर टिकून आहेत.

सरकीचे दर गेल्या वर्षी मार्चमध्ये २२०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे होते. सरकीचा साठाही बऱ्यापैकी होता. त्याचा वापर वर्षभरात झाला. सरकीची मागणी देशात खाद्यतेलासह कुक्कुटपालनासंबंधीचे खाद्य व इतर बाबींसाठी वाढली आहे. 

कारण सोयाबीनचे दर अधिक आहेत. त्याची आयात करावी लागत आहे. कुक्कुट उद्योगात सोयाबीनपासून तयार होणाऱ्या खाद्याची मागणी अधिक असते. परंतु यंदा सोयाबीन कमी उपलब्ध झाले. शिवाय त्याचे दर सरकीपेक्षा अधिक होते. यातच कोविड व इतर समस्यांमुळे कापसाची अधिकाधिक विक्री यंदा फेब्रुवारीपूर्वीच झाली. या दरम्यान कुक्कुट उद्योगाला लागणाऱ्या खाद्यासाठी सरकीचा वापर मोठा झाला. शिवाय खाद्यतेलासाठी देखील सरकीवर प्रक्रिया वेगात सुरू आहे. 

सरकीचे दर जानेवारीत २७०० रुपये प्रतिक्विंटल होते. यानंतर सतत दरवाढ झाली. मार्चच्या सुरवातीला दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे झाले. खाद्यतेल उद्योगात सरकीचा वापर यंदा वाढला आहे. कारण सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती मिळाली.

सरकीचा तुटवडा आणि तेजीचा हंगाम
देशात सुमारे ११०० ते १२०० कोटी क्विंटल सरकी उत्पादनाचा अंदाज होता. कापसाचे उत्पादन ३७० ते ३८० लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे येईल, असे विविध संस्था सांगत होत्या. परंतु उत्पादनात अतिपाऊस, गुलाबी बोंड अळी आदी कारणांनी घट आली. परिणामी सरकीचे उत्पादन ९०० ते ९६० कोटी क्विंटल एवढेच हाेईल, अशी स्थिती सध्या आहे. यामुळे सरकीच्या दरात मोठी तेजी आहे. तेजी पुढील हंगामापर्यंत कायम राहील, कारण सरकीचा साठाही वायदा बाजारात दिसत नसल्याची स्थिती आहे. सरकीच्या दरात पुढे आणखी वाढ होवू शकते, यामुळे पशुपालकांनी सरकी ढेपचा साठा करून घेण्याचे आवाहनदेखील बाजारपेठ विश्लेषकांनी केले आहे.

प्रतिक्रिया...
सरकीचे उत्पादन यंदा कापसाप्रमाणे घटले आहे. दरात वर्षभरात किमान एक हजार रुपयांची वाढ एक क्विंटलमागे झाली आहे. ही तेजी टिकून राहील. किंबहुना, आणखी दरवाढ होईल. 
- अरविंद जैन, सदस्य, 
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)


इतर अॅग्रो विशेष
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...