Agriculture news in Marathi Cotton seeds available for distribution in Akola | Agrowon

अकोल्यात १ जूननंतरच होणार कापूस बियाणे विक्री 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

अकोला ः राज्यात कापूस बियाणे विक्रीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्णय बदलण्यात आले आहेत. मात्र, अकोला जिल्ह्यात बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच विक्री व १५ जूननंतर पेरणी करण्यासाठी प्रशासनाने विक्रेते व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. याची जिल्हाभर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

अकोला ः राज्यात कापूस बियाणे विक्रीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्णय बदलण्यात आले आहेत. मात्र, अकोला जिल्ह्यात बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच विक्री व १५ जूननंतर पेरणी करण्यासाठी प्रशासनाने विक्रेते व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. याची जिल्हाभर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

राज्यात या हंगामात बीटी बियाणे एक मे पासून उपलब्ध करून देण्याबाबत सूचना काढण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय मागे घेत पुन्हा नव्याने विक्रीची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. अद्याप निश्‍चित तारीख आलेली नसली तरी अकोला जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात एक जूननंतरच बीटी बियाणे विक्री करण्याबाबत कृषी सेवा केंद्रांना सूचना केली आहे. बियाणे कंपन्यांनी २५ मे पासून ३१ मेपर्यंत पुरवठा करावा, असेही सांगण्यात आले आहे. 

अकोला जिल्ह्यामध्ये या हंगामात एक लाख ६० हजार हेक्टरवर कपाशी लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यात ७० टक्के क्षेत्र कोरडवाहू व ३० टक्के लागवड ओलिताची आहे. शासनाने हंगामासाठी जिल्ह्याला आठ लाख बियाणे पाकिटे मंजूर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून वितरकांकडे बियाणे पोचविण्यात आले आहे. 

कापसाचे मुबलक बियाणे आलेले आहे. यंदा बीटी बीजी १ बियाणे ६३५ व बीजी २ बियाणे पाकीट ७३० रुपये दराने विकण्याचे आदेश आहेत. हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर होऊ नये यासाठी बोंड अळीचे जीवनचक्र खंडीत करण्याचे नियोजन करण्यात आले. 

कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने कृषी खात्याने १ मे पासून शेतकऱ्यांना कपाशी बियाणे विक्री साठी परवानगी दिली होती. परंतु ही विक्री योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आलेले आहे. आता १५ मेपर्यंत वितरकांपर्यंत बियाणे उपलब्ध होईल. तर ३० मे पर्यंत विक्री केंद्रावर उपलब्ध करण्यात येईल. यानंतर १ जूनपासून शेतकऱ्यांना कपाशी बियाण्यांची विक्री केली जाणार आहे. 

कपाशीवरील बोंडअळीला पायबंद घालण्यासाठी पूर्व हंगामी कापूस लागवड टाळणे योग्य आहे. या उद्देशानेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ जूननंतर पेरणी करावी असे नियोजन केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक जूनपासून बियाणे मिळणार आहे. त्यापूर्वी बियाणे विक्री करू नये याचे स्पष्ट आदेश विक्रेते व कंपन्यांना दिलेले आहेत. आदेश न पाळणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. 
- मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला 

बीटी बियाण्याचे यंदाचे दर 
बीजी १ कापूस बियाणे ६३५ रुपये पाकीट
बीजी २ कापूस बियाणे ७३० रुपये पाकीट
जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेते ६४० 
जिल्ह्याची मागणी ८ लाख पाकीट
संभाव्य लागवड क्षेत्र १ लाख ६० हजार हेक्टर 
विक्रीची तारीख १ जून पासून

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...