जळगावात वितरकांकडे कापूस बियाणे दाखल

जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने तयारी करीत आहेत. तशीच तयारी बियाणे कंपन्या, वितरकही करीत आहेत. कापूस लागवड जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख ३५ हजार हेक्टरवर होणार आहे.
Cotton seeds delivered to distributors in Jalgaon
Cotton seeds delivered to distributors in Jalgaon

जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने तयारी करीत आहेत. तशीच तयारी बियाणे कंपन्या, वितरकही करीत आहेत. कापूस लागवड जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख ३५ हजार हेक्टरवर होणार आहे. कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना १ जूनपासून कृषी केंद्रात खरेदी करता येईल. तत्पूर्वी हे बियाणे विविध कंपन्यांच्या वितरकांकडे दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

जिल्ह्यात कापसाच्या बियाण्याची मोठी मागणी असते. यंदा २६ लाखांवर बीटी कापूस व सरळ कापूस वाणांच्या पाकिटांचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा ऐनवेळी करण्याऐवजी कंपन्यांनी वितरकांकडे बियाणे पुरवठा सुरू केला आहे. पुरवठा किती व कुणाकडे होत आहे, याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह इतर यंत्रणांना दिली जात आहे. ही माहिती आवश्यकतेनुसार बियाण्यासंबंधी नियुक्त भरारी पथके, जिल्हा प्रशासनालाही दिली जात आहे. कापूस बियाण्याचा काळाबाजार जिल्ह्यात सुरू आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनही दक्ष होऊन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

‘बियाणे विक्री १५ मे नंतर करा’ जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड अधिक असते. ही लागवड काही वर्षांपूर्वी १५, २० मे पासून सुरू व्हायची. परंतु गेले दोन वर्षे व यंदाही गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्यासंबंधी बियाणे १ जूनपासून विक्री करण्याचा निर्णय यंत्रणांनी घेतला आहे. यामुळे हे बियाणे उशिरा मिळणार आहे, असे शेतकरी लोकप्रतिनिधी म्हणत आहेत. कापूस बियाणे विक्री १५ मे नंतर जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी अलीकडेच जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com