Agriculture news in Marathi Cotton seeds delivered to distributors in Jalgaon | Page 2 ||| Agrowon

जळगावात वितरकांकडे कापूस बियाणे दाखल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने तयारी करीत आहेत. तशीच तयारी बियाणे कंपन्या, वितरकही करीत आहेत. कापूस लागवड जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख ३५ हजार हेक्टरवर होणार आहे.

जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने तयारी करीत आहेत. तशीच तयारी बियाणे कंपन्या, वितरकही करीत आहेत. कापूस लागवड जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख ३५ हजार हेक्टरवर होणार आहे. कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना १ जूनपासून कृषी केंद्रात खरेदी करता येईल. तत्पूर्वी हे बियाणे विविध कंपन्यांच्या वितरकांकडे दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

जिल्ह्यात कापसाच्या बियाण्याची मोठी मागणी असते. यंदा २६ लाखांवर बीटी कापूस व सरळ कापूस वाणांच्या पाकिटांचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा ऐनवेळी करण्याऐवजी कंपन्यांनी वितरकांकडे बियाणे पुरवठा सुरू केला आहे. पुरवठा किती व कुणाकडे होत आहे, याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह इतर यंत्रणांना दिली जात आहे. ही माहिती आवश्यकतेनुसार बियाण्यासंबंधी नियुक्त भरारी पथके, जिल्हा प्रशासनालाही दिली जात आहे. कापूस बियाण्याचा काळाबाजार जिल्ह्यात सुरू आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनही दक्ष होऊन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

‘बियाणे विक्री १५ मे नंतर करा’
जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड अधिक असते. ही लागवड काही वर्षांपूर्वी १५, २० मे पासून सुरू व्हायची. परंतु गेले दोन वर्षे व यंदाही गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्यासंबंधी बियाणे १ जूनपासून विक्री करण्याचा निर्णय यंत्रणांनी घेतला आहे. यामुळे हे बियाणे उशिरा मिळणार आहे, असे शेतकरी लोकप्रतिनिधी म्हणत आहेत. कापूस बियाणे विक्री १५ मे नंतर जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी अलीकडेच जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

 


इतर बातम्या
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...