agriculture news in Marathi cotton shortage in country Maharashtra | Page 4 ||| Agrowon

कापसाचा तुटवडा जाणवू लागला 

चंद्रकांत जाधव
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार झाली आहे. रोज एक लाख गाठींपेक्षा (एक गाठ १७० किलो रुई) अधिक गरज गिरण्यांना सूतनिर्मितीसाठी आहे. परंतु कापूस गाठींचे दरही वधारले आहेत. 

जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार झाली आहे. रोज एक लाख गाठींपेक्षा (एक गाठ १७० किलो रुई) अधिक गरज गिरण्यांना सूतनिर्मितीसाठी आहे. परंतु कापूस गाठींचे दरही वधारले आहेत. अशा स्थितीत सहकारी सूतगिरण्यांसाठी कापूस गाठींचा स्टॉक करावा व तो वाजवी दरात उपलब्ध करून द्यावा, असा मुद्दा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाने उपस्थित केला आहे. 

याबाबत राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातील मंडळीची सूतगिरण्यांचे अध्यक्ष, यंत्रमागधारक आदींनी भेट घेतली आहे. त्यात वस्त्रोद्योगासमोरच्या अडचणींसह कापूस गाठींचा सुरळीत व वाजवी दरात पुरवठा व्हावा याची मागणी करण्यात आली. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांना आपापल्या समस्यांबाबत वस्त्रोद्योग महासंघाने माहिती दिली असून, समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले आहे. 

राज्यात सर्वाधिक सहकारी सूतगिरण्या आहेत. यात १५० सूतगिरण्या कार्यरत आहेत. राज्यातील सूतगिरण्यांसाठी १४ लाख गाठी राखीव करून त्याचा स्टॉक करावा आणि वाजवी दरात या गाठींचा पुरवठा राज्यातील सूतगिरण्यांना करावा, अशी मागणी वस्त्रोद्योग महासंघाने केली आहे. देशात सर्वाधिक ४०० सूतगिरण्या तमिळनाडूमध्ये आहेत. सध्या देशभरातील गिरण्यांना रोज एक लाखापेक्षा अधिक गाठींची गरज सूतनिर्मितीसाठी आहे. परंतु एवढ्या गाठी वाजवी दरात उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. 

कापूस महामंडळाकडे (सीसीआय) सुमारे १०० लाख गाठींचा साठा होता. यात यंदाच्या हंगामात ९१ लाख गाठींची खरेदी केली आहे. यातील ३५ टक्के गाठींची विक्री सीसीआयने ई-लिलाव पद्धतीने केली आहे. लिलावात काही मोठ्या संस्था सहभाग घेऊन खरेदी करीत आहेत. खंडीचे दर (३५६ किलो रुईची एक खंडी) महिनाभरात चार हजार रुपयांनी वधारून ४५ ते ४६ हजार रुपये प्रतिखंडी, असे आहेत. हे दर अडचणीतील सूतगिरण्यांसाठी परवडणारे नाहीत. शिवाय आयातीत गाठींचे दरही आयात शुल्क पाच टक्के केल्याने परवडणारे नाहीत. दुसरीकडे देशात कापसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येईल, अशी स्थिती तयार होत आहे. 

कापूस उत्पादन घटणार 
देशात कापसाचे उत्पादन ३७० लाख गाठी एवढे येईल, असा अंदाज जुलै, ऑक्टोबर यादरम्यान कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी व्यक्त केला होता. परंतु हा अंदाज अतिवृष्टी व प्रतिकूल स्थितीनंतर सतत बदलत गेला. आता देशात ३२० ते ३२५ लाख गाठींच्या उत्पादनाचा नवा अंदाज सांगितला जात आहे. दुसरीकडे देशातील सूतगिरण्यांना २६० ते २७० लाख गाठींची गरज असणार आहे. त्यात गाठींची निर्यात वाढत आहे. ही निर्यात किमान ५० लाख गाठींची होईल, असे संकेत आहेत. अशा स्थितीत सूतगिरण्यांसह लघुउद्योगासाठी कापूसटंचाई तयार होईल. अडचणीतील गिरण्या १०० टक्के क्षमतेने कार्यवाही करू शकणार नाहीत, अशी स्थिती तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रतिक्रिया
खंडीचे दर (३५६ किलो रुई) महिनाभरात चार हजार रुपयांनी वधारले आहेत. कापसाची आयात महाग ठरत आहे. देशात उत्पादन कमी येईल, असे सांगितले जात असले, तरी कापसाचा पुरेसा साठा आहे. कापूस महाग होत आहे, पण सुताचे दरही वधारले आहेत. अडचणीतील वस्त्रोद्योगाला शासनाने मदतीचा हात पुढे केल्यास गिरण्यांचा नफा वाढू शकेल व अडचणी दूर होतील. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती) 


इतर अॅग्रोमनी
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...