मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख हेक्टरने घट

मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३१ हजार हेक्टरने कपाशीची कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे.
cotton sowing
cotton sowing

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३१ हजार हेक्टरने कपाशीची कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदा मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्‍टर होते. प्रत्यक्षात १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टरवर, म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात कपाशीच्या सर्वसाधारण ३ लाख ५७ हजार हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख १८ हजार १४९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जालना जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९० हजार १५१ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात १०६ टक्के क्षेत्रावर अर्थात ३ लाख ७ हजार ७ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९४ हजार २६७ हेक्‍टर होते. त्या तुलनेत ३ लाख ९१ हजार २६१ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे.  हिंगोली जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ८३ हजार ७३० हेक्टर असताना केवळ ४६ टक्के अर्थात ३८ हजार ७९८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. परभणी जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८५ हजार ७२० हेक्‍टर असताना प्रत्यक्षात ९५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख ७६ हजार ५०१ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व साधारण २ लाख ६० हजार ५०५ हेक्टर कपाशी क्षेत्राच्या तुलनेत २ लाख १४ हजार ४८७ हेक्‍टरवर अर्थात ८२ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात क्षेत्र निम्म्यावर उस्मानाबाद जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार २४१ हेक्टर होते. त्या तुलनेत ८ हजार १ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. लातूर जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ हजार १३३ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८ हजार २७५ हेक्टर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २६४ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com