देशात ९२ लाख हेक्टरवर कापूस

देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत ९२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ४६ लाख हेक्टरवर कापूस होता.
cotton planting
cotton planting

मुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत ९२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ४६ लाख हेक्टरवर कापूस होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जवळपास दुप्पट लागवड झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली.  हंगामाच्या सुरुवातीपासून देशभरात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कापूस लागवडीने वेग घेतला. कापसाची लागवड प्रामुख्याने सिंचनाची सुविधा असलेल्या भागांत एप्रिलपासूनच सुरू होते. पावसावर आधारित भागांत जूननंतर लागवडी होतात. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये लागवडी आघाडीवर असून आता लागवड अंतिम टप्प्यात आहे. उत्तर भारतातील आघाडीवरील हरियानामध्ये कापूस लागडीखालील क्षेत्रात ९ टक्के वाढ झाली आहे. हरियानात ७ लाख ३७ हजार हेक्टरवर लागवड झाली. पंजाबमध्येही आत्तापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत २४.६ टक्क्यांनी लागवड वाढून ५ लाख हेक्टरवर पीक आहे. तर राजस्थानमध्ये तब्बल ८२ टक्के लागवड वाढून ६ लाख २७ हजार ८०० हेक्टरवर कापूस आहे.   देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्य असलेल्या गुजरातमध्ये आतापर्यंत १६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गुजरातमध्ये गेल्या वर्षी याच काळात १४ लाख हेक्टवर पेरणी झाली होती. त्यानंतर महाराष्‍ट्रात ३३ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गल्या वर्षी याच काळात ४ लाख ५६ हजार ५०० हेक्टरवर लागवड होती. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्येच देशातून एकूण क्षेत्रापैकी ५५ ते ६० टक्के लागवडी होतात. 

हमीभाववाढीमुळे वाढली लागवड केंद्र सरकारने खरीप २०२०-२१ साठी मध्यम लांबी धागा असलेल्या कापसाच्या हमीभावात प्रतिक्विंटल २६० रुपयांनी वाढ केली असून दर ५ हजार ५१५ रुपये केला. तर लांब धाग्याच्या कापसाला २७५ रुपये वाढ करून ५ हजार ८२५ रुपये दर केला आहे. सरकारने हमीभावात वाढ केल्यानेही शेतकरी यंदा कापूस लागवडीकडे वळाले आहेत. अनेक राज्यांमध्ये शेतकरी यंदा इतर पिकांकडून कापसाकडे वळाले आहेत. भात उत्पादक वळाले कापसाकडे पंजाब आणि हरियाना या राज्यांत भातासाठी आवश्‍यक पाण्याची कमतरता, कॅनॉलला पाणी नसणे, दरातील अनिश्‍चितता, हमीभाव योजनेचा अभाव, भात लागवड आणि काढणीसाठी मजुरांची टंचाई आदी प्रश्‍नांमुळे भात उत्पादक यंदा कापसाकडे वळाले आहेत. त्यामुळे पंजाब आणि हरियाना या दोन्ही राज्यांमध्ये कापूस लागवडी वाढल्या आहेत, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

राज्यनिहाय कापूस लागड (लाख हेक्टरमध्ये)

राज्य   २०२०-२१ २०१९-२० बदल (टक्के)
आंध्र प्रदेश ०.९०  ०.४३ १०९.५
तेलंगण १५.३९  ७.८९ ९५.०
गुजरात  १५.७१  १४.३५ ९.५ 
हरियाना  ७.३७ ६.७६ ९.० 
कर्नाटक    २.०३   ०.६६  २०८.५
मध्य प्रदेश  ५.४०   ३.०१ ७९.४
महाराष्ट्र   ३३.०८  ४.५६  ६२४.६ 
पंजाब  ५.०१  ४.०२ २४.६
राजस्थान  ६.२७   ३.४५   ८२.०
इतर ०.४८  ०.४३  १४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com