पाकिस्तानमध्ये कापूस लागवड १२ टक्‍क्यांनी घटली 

पाकिस्तानातील कापूस लागवड क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८ मध्ये २७ लाख हेक्‍टरवरुन २०१८-१९ मध्ये लागवड क्षेत्र २३ लाख हेक्‍टरवर आले आहे. भारतातही लागवड क्षेत्रात चढउतार होत राहतात. त्यावरुन जागतीकस्तरावर एकदम परिणाम होत नाही. - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर
cotton.
cotton.

नागपूर ः वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेत होणारी घट तसेच कमी दर अशा विविध कारणांमुळे पाकिस्तानमध्ये कापसाखालील क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून काही क्षेत्रावर नगदी पीक असलेल्या ऊसाच्या लागवडीवर भर दिला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षात पाकिस्तानात १२ टक्‍के कापूस क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज आहे.  सद्यस्थितीत जागतीकस्तरावर कापूस उत्पादक क्रमवारीत पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. परंतू कापूस लागवड क्षेत्रात सातत्याने होणारी घट पाहता हे स्थान पाकिस्तानला गमवावे लागण्याची स्थिती जाणकार व्यक्‍त करतात. विदेशी निर्यातीच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ५५ टक्‍के वाटा कापसाचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. २०१८ मध्ये पाकिस्तानच्या एकूण २३.७ अब्ज डॉलरच्या निर्यातीपैकी १३.५३ अब्ज डॉलरची निर्यात कापड उद्योगाची होती. एकूण निर्यात उत्पन्नापैकी ही हिस्सेदारी ५० टक्‍केपेक्षा अधिक होती. त्यावरुनच पाकिस्तानमधील कापसावरील आधारीत अर्थव्यवस्थेचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.  पाकिस्तानमध्ये गेल्या पाच वर्षात कापूस लागवडीखालील क्षेत्रात १२ टक्‍के घट तर ऊस लागवड क्षेत्रात ४० टक्‍के वाढ नोंदविली गेली आहे. १४.४ अब्ज गाठींच्या तुलनेत गेल्यावर्षी ९.८६ अब्ज (मिलीयन) गाठींचे उत्पादन कसबसे होऊ शकले. या तुलनात्मकस्थितीवरुन देखील कापूस लागवड क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचे सिध्द होते. पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनने १५ जानेवारीपर्यंत कारखान्यांपर्यंत पोचणाऱ्या एकूण कापसात २० टक्‍के घट नोंदविली आहे. परिणामी देशाअंतर्गंत गरज भागविण्याकरिता उद्योजकांना आयातीशिवाय पर्यायच उरला नाही.  यावर्षी देशात सुमारे २ अब्ज डॉलर कापसाची आयात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पाकिस्तानमध्ये गहू, तांदूळ आणि ऊसाचे उत्पादन वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी आपातकालीन कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. कापसाखालील क्षेत्र कमी होत असताना त्याचा मात्र या कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार देखील कापूस शेतीला पोषक वातावरण तयार करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप होत आहे. कापूस शेतीत उत्पादकता खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. हे देखील एक कारण शेतकरी ऊसाकडे वळण्यामागे दिले जाते. याचा परिणामी देशाअंतर्गंत कापड उद्योगावर होणार नाही, असे सांगताना बांग्लादेशचे उदाहरण समोर के जाते. बांग्लादेशमध्ये कापड उद्योग विस्तारीत असला तरी कापूस लागवड क्षेत्र जेमतेम आहे.  साखर कारखान्यांची संख्या वाढली  ब्राझील, भारत, थाईलॅंड आणि चीननंतर पाकिस्तान रिफाईंड साखरेचा पाचवा मोठा उत्पादक ठरला आहे. त्यामध्ये देशात साखर कारखान्यांची वाढती संख्या हे देखील एक कारण दिले जाते. सिंध प्रांतात ३८, पंजाबमध्ये ५० कारखाने आहेत. देशात एकूण ९५ साखर कारखाने आहेत. ५.६ मिलीयन टन साखरेच्या देशाअंतर्गंत मागणीची गरज यातून पूर्ण होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com