agriculture news in Marathi cotton sowing reduced in pakistan by 12 percent Maharashtra | Agrowon

पाकिस्तानमध्ये कापूस लागवड १२ टक्‍क्यांनी घटली 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

पाकिस्तानातील कापूस लागवड क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८ मध्ये २७ लाख हेक्‍टरवरुन २०१८-१९ मध्ये लागवड क्षेत्र २३ लाख हेक्‍टरवर आले आहे. भारतातही लागवड क्षेत्रात चढउतार होत राहतात. त्यावरुन जागतीकस्तरावर एकदम परिणाम होत नाही. 
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर 

नागपूर ः वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेत होणारी घट तसेच कमी दर अशा विविध कारणांमुळे पाकिस्तानमध्ये कापसाखालील क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून काही क्षेत्रावर नगदी पीक असलेल्या ऊसाच्या लागवडीवर भर दिला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षात पाकिस्तानात १२ टक्‍के कापूस क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज आहे. 

सद्यस्थितीत जागतीकस्तरावर कापूस उत्पादक क्रमवारीत पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. परंतू कापूस लागवड क्षेत्रात सातत्याने होणारी घट पाहता हे स्थान पाकिस्तानला गमवावे लागण्याची स्थिती जाणकार व्यक्‍त करतात. विदेशी निर्यातीच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ५५ टक्‍के वाटा कापसाचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. २०१८ मध्ये पाकिस्तानच्या एकूण २३.७ अब्ज डॉलरच्या निर्यातीपैकी १३.५३ अब्ज डॉलरची निर्यात कापड उद्योगाची होती. एकूण निर्यात उत्पन्नापैकी ही हिस्सेदारी ५० टक्‍केपेक्षा अधिक होती. त्यावरुनच पाकिस्तानमधील कापसावरील आधारीत अर्थव्यवस्थेचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. 

पाकिस्तानमध्ये गेल्या पाच वर्षात कापूस लागवडीखालील क्षेत्रात १२ टक्‍के घट तर ऊस लागवड क्षेत्रात ४० टक्‍के वाढ नोंदविली गेली आहे. १४.४ अब्ज गाठींच्या तुलनेत गेल्यावर्षी ९.८६ अब्ज (मिलीयन) गाठींचे उत्पादन कसबसे होऊ शकले. या तुलनात्मकस्थितीवरुन देखील कापूस लागवड क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचे सिध्द होते. पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनने १५ जानेवारीपर्यंत कारखान्यांपर्यंत पोचणाऱ्या एकूण कापसात २० टक्‍के घट नोंदविली आहे. परिणामी देशाअंतर्गंत गरज भागविण्याकरिता उद्योजकांना आयातीशिवाय पर्यायच उरला नाही. 

यावर्षी देशात सुमारे २ अब्ज डॉलर कापसाची आयात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पाकिस्तानमध्ये गहू, तांदूळ आणि ऊसाचे उत्पादन वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी आपातकालीन कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. कापसाखालील क्षेत्र कमी होत असताना त्याचा मात्र या कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार देखील कापूस शेतीला पोषक वातावरण तयार करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप होत आहे.

कापूस शेतीत उत्पादकता खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. हे देखील एक कारण शेतकरी ऊसाकडे वळण्यामागे दिले जाते. याचा परिणामी देशाअंतर्गंत कापड उद्योगावर होणार नाही, असे सांगताना बांग्लादेशचे उदाहरण समोर के जाते. बांग्लादेशमध्ये कापड उद्योग विस्तारीत असला तरी कापूस लागवड क्षेत्र जेमतेम आहे. 

साखर कारखान्यांची संख्या वाढली 
ब्राझील, भारत, थाईलॅंड आणि चीननंतर पाकिस्तान रिफाईंड साखरेचा पाचवा मोठा उत्पादक ठरला आहे. त्यामध्ये देशात साखर कारखान्यांची वाढती संख्या हे देखील एक कारण दिले जाते. सिंध प्रांतात ३८, पंजाबमध्ये ५० कारखाने आहेत. देशात एकूण ९५ साखर कारखाने आहेत. ५.६ मिलीयन टन साखरेच्या देशाअंतर्गंत मागणीची गरज यातून पूर्ण होते. 


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...