agriculture news in Marathi cotton steal from two acre in daigaon Maharashtra | Agrowon

दहिगावात दोन एकरांतील कापूस नेला चोरून

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता घटली आहे. अनेकांना एकरी एक क्विंटलही सोयाबीन झाले नाही. आता खारपाण पट्ट्यात कापसाचे पीक उभे असून वेचणी सुरू झाली. 

अकोला ः यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता घटली आहे. अनेकांना एकरी एक क्विंटलही सोयाबीन झाले नाही. आता खारपाण पट्ट्यात कापसाचे पीक उभे असून वेचणी सुरू झाली. मात्र या कापसावर चोरट्यांच्या नजरा गेल्या असून, दहिगाव गावंडे शिवारात दोन एकरांतील कापूस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. याबाबत शेतकऱ्याने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी शेताला भेट देत पंचनामा केला आहे.

जिल्ह्यात खारपाण पट्ट्यात कापूस वेचणी सुरू झाली आहे. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सीतादही’ करीत वेचणीला प्रारंभ केला. दहिगाव येथील योगेश गावंडे यांनीही पहिल्या वेचणीसाठी गुरुवारी (ता.१९) महिला मजूर सांगितले होते. महिलांनी वेचणीला सुरुवात केल्यानंतर शेतात मध्यभागातील झाडांवर कापूस नसल्याचे दिसून आले. महिलांनी हा प्रकार योगेश गावंडे यांना सांगितला. पाहणी केल्यानंतर कापसाची चोरी झाल्याचे दिसून आले. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

गावंडे यांच्या शेतापासून काही अंतरावर पाटालगत रोड आहे. चोरटे याच रस्त्याने येऊन कापूस चोरी करून घेऊन गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. योगेश गावंडे यांनी तातडीने बोरगावमंजू पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार केली. पोलिस काँस्टेबल श्री. मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ शेताला भेट देत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रतिक्रिया
यंदा या भागात योग्य पीकपाणी नाही. मजुरी नसल्याने सर्वच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत चोरीच्या घटना वाढल्या. माझ्या शेतातील कापूस चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आता इतर शेतकरी सतर्क झाले असून, आपापल्या शेतात पाहणी करू लागले आहेत. चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.
- योगेश दादाराव गावंडे, शेतकरी, दहिगाव गावंडे, ता. जि. अकोला


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...