महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
अॅग्रो विशेष
बीटी कापसाचे सरळ वाण विकसित
संस्थेने चार सरळ वाणांमध्ये क्राय-वन एसी जनुकाचा अंतर्भाव केला आहे. त्यावरील मोन्सॅन्टो कंपनीचा स्वामित्व हक्क संपुष्टात आल्याने या जनुकाच्या वापरापोटी रॉयल्टी भरावी लागणार नाही. त्यामुळे स्वस्तात हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. याचा एकरी बियाणे वापर अडीच ते तीन किलो आहे. दोन बाय एक फूट अंतरावर त्याची लागवड करण्याबाबत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत आहोत.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
नागपूर: केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापसाच्या चार सरळ वाणांमध्ये क्राय-वन एसी (बीजी-१) या जनुकाचा अंतर्भाव केला आहे. महाबीज या कंपनीमार्फत हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरिता बीजोत्पादनासंदर्भाने महाबीजशी करार केला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या सूत्रांनी दिली.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सघन लागवडीला पूरक आणि उत्पादनक्षम वाणांना चालना देताना कपाशीचे चार बीटी सरळ वाण विकसित केले आहेत. त्यामध्ये सूरज, रजत, पीकेव्ही-०८१ आणि जीजेएचव्ही-३७४ या वाणांचा समावेश आहे. यात क्राय वन एसी या जनुकाचा वापर केला आहे. चीनसह जगातील अनेक देशांमध्ये बीटी जनुकांचा वापर सरळ वाणांमध्ये केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे विकत घ्यावे लागत नाही. परिणामी, बियाणांवरील खर्च पर्यायाने उत्पादकता खर्च कमी होतो.
संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे म्हणाले, की संबंधित बियाणे किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना वापरता येणार आहे. क्राय-वन एसी जनुकावरील मोन्सॅटो कंपनीचे अधिकारदेखील संपुष्टात आले आहेत. त्यामुळे रॉयल्टी द्यावी लागणार नसल्याने स्वस्तात हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. वाघमारे यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर या वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यातील निष्कर्षानुसार हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव मेरा अभिमान’ या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे ९ क्लस्टर्स आहेत. यात गाव असलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे देण्यात आले आहे.
महाबीजशी बियाणे उत्पादन करार
संबंधीत सरळ बीटी वाण बियाणे महाबीज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता रीतसर करार करण्यात आल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
- 1 of 435
- ››