agriculture news in Marathi, cotton straight variety developed, Maharashtra | Agrowon

बीटी कापसाचे सरळ वाण विकसित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

संस्थेने चार सरळ वाणांमध्ये क्राय-वन एसी जनुकाचा अंतर्भाव केला आहे. त्यावरील मोन्सॅन्टो कंपनीचा स्वामित्व हक्‍क संपुष्टात आल्याने या जनुकाच्या वापरापोटी रॉयल्टी भरावी लागणार नाही. त्यामुळे स्वस्तात हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. याचा एकरी बियाणे वापर अडीच ते तीन किलो आहे. दोन बाय एक फूट अंतरावर त्याची लागवड करण्याबाबत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत आहोत. 
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

नागपूर: केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापसाच्या चार सरळ वाणांमध्ये क्राय-वन एसी (बीजी-१) या जनुकाचा अंतर्भाव केला आहे. महाबीज या कंपनीमार्फत हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरिता बीजोत्पादनासंदर्भाने महाबीजशी करार केला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या सूत्रांनी दिली. 

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सघन लागवडीला पूरक आणि उत्पादनक्षम वाणांना चालना देताना कपाशीचे चार बीटी सरळ वाण विकसित केले आहेत. त्यामध्ये सूरज, रजत, पीकेव्ही-०८१ आणि जीजेएचव्ही-३७४ या वाणांचा समावेश आहे. यात क्राय वन एसी या जनुकाचा वापर केला आहे. चीनसह जगातील अनेक देशांमध्ये बीटी जनुकांचा वापर सरळ वाणांमध्ये केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे विकत घ्यावे लागत नाही. परिणामी, बियाणांवरील खर्च पर्यायाने उत्पादकता खर्च कमी होतो.

 संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे म्हणाले, की संबंधित बियाणे किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना वापरता येणार आहे. क्राय-वन एसी जनुकावरील मोन्सॅटो कंपनीचे अधिकारदेखील संपुष्टात आले आहेत. त्यामुळे रॉयल्टी द्यावी लागणार नसल्याने स्वस्तात हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. वाघमारे यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर या वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यातील निष्कर्षानुसार हेक्‍टरी २५ ते ३० क्‍विंटल उत्पादन मिळाले आहे.

केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव मेरा अभिमान’ या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे ९ क्‍लस्टर्स आहेत. यात गाव असलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे देण्यात आले आहे. 

महाबीजशी बियाणे उत्पादन करार
संबंधीत सरळ बीटी वाण बियाणे महाबीज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता रीतसर करार करण्यात आल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.  


इतर बातम्या
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...