Agriculture news in marathi Cotton threshing in Motala taluka | Agrowon

मोताळा तालुक्यात कपाशीला दणका

टीम अॅग्रोवन
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

बुलडाणा : मोताळा तालुक्यात गेल्या काळात झालेल्या संततधार पावसाचा कपाशीच्या पिकाला मोठा दणका बसला आहे.

बुलडाणा : मोताळा तालुक्यात गेल्या काळात झालेल्या संततधार पावसाचा कपाशीच्या पिकाला मोठा दणका बसला आहे. या नुकसानाच्या भरपाईवरून शेतकरी संघटना सातत्याने आंदोलने करीत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलाही आधार मिळालेला नसल्याने तो पुरता खचला आहे.

मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार हा परिसर कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. यंदा पाऊस व वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. कोऱ्हाळा बाजार गावातील संदीप श्रीकृष्ण दांडगे या शेतकऱ्याने हंगामात सुरुवातीलाच सहा एकरात बीटी कपाशीचे वाण लावले.

योग्य मशागत व व्यवस्थापन केल्याने पीक चांगले वाढले होते. झाडांवर कैऱ्याही मोठ्या संख्येने लागल्या होत्या. असे असतानाच ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसामुळे परिपक्व झालेले बोंडे खराब झाली. सोबतच वादळी वाऱ्यामुळे पीक जमीनदोस्त झाले. या भागात सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस झाला. झाडांवरील पानेही गळली. 

सध्या शेतात प्रत्येक झाडावर काळवंडलेली बोंडेच तेवढी दिसत आहेत. कुठल्याही बोंडातून चांगला कापूस निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. एकरी १५ ते २० हजारांचा आजवर खर्च लागला. सहा एकरासाठी एक लाखावर खर्च झाला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...