Agriculture news in Marathi Cotton will be procured from 25,000 farmers from Nagpur | Agrowon

नागपूरमधून २५ हजार शेतकऱ्यांकडून होणार कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

नागपूर ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात १५ खरेदी सुरू करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून येत्या १५ ते २० दिवसांत संपूर्ण कापसाची खरेदी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

नागपूर ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात १५ खरेदी सुरू करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून येत्या १५ ते २० दिवसांत संपूर्ण कापसाची खरेदी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून सीसीआय तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून जिल्ह्यात कापसाची खरेदी होत आहे. कोरोनानंतर जाहीर लॉकडाऊननंतर ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता नोंदणी केली. त्यातील ३ हजार ५०४ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. अद्याप २५ हजार ६४८ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.

कापूस खरेदी करताना नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यादृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेण्यात आली आहे. रविवार वगळता इतर सुटीच्या दिवशी कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली. कापूस खरेदीसाठी १५ जिनींग व प्रेसिंगमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आवश्‍यक ग्रेडर कृषी विभागामार्फत नियुक्‍त करण्यात आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...