agriculture news in marathi, cotton wool percentage add for cotton rate, nagpur, maharashtra | Agrowon

रुईची टक्‍केवारी ग्राह्य धरल्यास कापसाला मिळेल अधिक दर

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 ऑगस्ट 2018

उसाचे दर ठरविताना साखरेचे प्रमाण, तर दुधाचे दर ठरविताना फॅटचा निकष आहे. त्याप्रमाणे अनेक देशांमध्ये कापसाच्या दरासंदर्भाने रुईची टक्‍केवारी गृहीत धरून दर निश्‍चित होतात. यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे. त्याकरिता कापसाची खरेदी होणाऱ्या बाजार समितीस्तरावर जिनिंगची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- गोविंद वैराळे, कापूस क्षेत्रातील अभ्यासक, नागपूर

नागपूर ः कापसाचे भाव ठरविण्यासाठी त्यातील रुईच्या टक्‍केवारीचा विचार व्हावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. सद्यःस्थितीत कापसाचे दर ठरविताना सरासरी ३३ ते ३४ टक्‍के इतकेच रुईचे प्रमाण अपेक्षित धरले जाते. त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍याला १०० रुपये जादा दर मिळणार असल्याने त्याकरिता जिनिंगची सुविधादेखील बाजार समितीस्तरावर शासनाने उपलब्ध करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

कापूस प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात १८ कोटी क्‍विंटल कापूस उत्पादन होते. कापसाला ५००० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर अपेक्षित धरल्यास देशार्गंत ९० हजार कोटी रुपयांची उलाढाल कापूस उद्योगात होते. परंतु कापसाचे दर ठरविण्यासाठी जागतिक स्तरावर असलेल्या निकषांऐवजी रुईची टक्‍केवारी ३३ ते ३४ टक्‍के गृहीत धरली जाते. त्यामुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वर्धा जिल्ह्यात रुईची टक्‍केवारी काढून २०१६-१७ या हंगामात दर दिला गेला होता. या माध्यमातून क्‍विंटलमागे ५०० रुपये जादा कापूस उत्पादकांना मिळाले होते. सध्या अस्तित्वात असलेल्या वाणांमध्ये ३७ ते ४२ टक्‍के रुईचे प्रमाण आहे. परंतु शेतकऱ्यांकडील कापसाचे भाव ठरविताना ३३ ते ३४ टक्‍के रुईचे प्रमाण अपेक्षित धरले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांकडील जास्त रुईचे प्रमाण असलेल्या कापसालादेखील जास्त भाव मिळू शकत नाही.त्याकरिता बाजार समितीस्तरावर रुई तपासणीसाठी जिनिंगची व्यवस्था असण्याची गरज तज्ज्ञ उद्योजकांनी व्यक्‍त केली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...