agriculture news in marathi, countries highest petrol rates in Marathwada | Agrowon

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात !
संभाजी रा. देशमुख
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढविले जात आहेत. यात कंपनींच्या दारापासून ते ग्राहकांच्या वाहनापर्यंत तेलाचा दर जवळजवळ दुप्पट होतो. यामध्ये अबकारी कर, राज्य सरकारांचा कर, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमीशन समावेश असतो. यामुळे देशात सर्वाधिक महागडे पेट्रोल मराठवाड्यात परभणीत मिळते आहे. त्याखालोखाल नांदेड आणि लातूरचा क्रमांक लागतो. 

लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढविले जात आहेत. यात कंपनींच्या दारापासून ते ग्राहकांच्या वाहनापर्यंत तेलाचा दर जवळजवळ दुप्पट होतो. यामध्ये अबकारी कर, राज्य सरकारांचा कर, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमीशन समावेश असतो. यामुळे देशात सर्वाधिक महागडे पेट्रोल मराठवाड्यात परभणीत मिळते आहे. त्याखालोखाल नांदेड आणि लातूरचा क्रमांक लागतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे वाढते दर आणि दिवसेंदिवस घसरत्या रुपयांच्या मूल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवावे लागत आहेत. त्यात केंद्र सरकारने तब्बल तेरा वेळा तेलावरील अबकारी करात वाढ केली आहे. तर देशात सर्वाधिक तेलावर कर आकारण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये या पदार्थांवर दोन स्तरात व्हॅट आकारणी होते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी 39.12 टक्के तर उर्वरित महाराष्ट्रसाठी किंचित कमी आकारणी केली जाते. यामुळे देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करामुळे पेट्रोल अधिक महाग आहे. त्यात पेट्रोलिअम कंपन्यांच्या तळापासून शहराच्या अंतरावर वाहतूक खर्चानुसार दर वाढवून वितरकांचे कमीशनही जोडले जाते. यामुळे परभणीत रविवारी एक लिटरला पेट्रोल 91 रुपये 35पैसे, नांदेडमध्ये 91 रुपये 12 पैसे तर लातूरमध्ये 90 रुपये २८ पैसे लागत होते. 

गेल्या आठवड्यात बंगाल, राजस्थान आणि तामिळनाडू सरकरने करामध्ये कपात करून पेट्रोल आणि डिझेल दर काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक करांमधील तफावतीमुळे देशात सर्वाधिक स्वत म्हणजे एक लिटर पेट्रोल पोर्ट ब्लेअर येथे ७० रुपये २६ पैसे, त्यानंतर पणजीमध्ये ७५ रुपये ३० पैसे लागत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे एकाच देशात पेट्रोलच्या दरावर तब्बल वीस रुपयांचा फरक निर्माण झाला आहे.  

रविवारी (ता.१६) मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये असलेले प्रति लिटर पेट्रोल दर

१. परभणी - 91.35 रुपये

२. नांदेड - 91.12 रुपये

३. लातूर - 90.28 रुपये

४. बीड - 90.25 रुपये

५.हिंगोली - 90. 22 रुपये

६. जालना - 90. 20 रुपये

७. उस्मानाबाद - 89.81 रुपये

८. औरंगाबाद - 87 रुपये

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...